तुमचा बराच मोकळा वेळ इंटरनेट/ मोबाइल गेम्स, फोन साठा खर्च होतो आहे, तुम्ही काय कराल? का?
Answers
Amhi toh vel kami kami krt jau.....
aani ekkda ka toh smpla kii brainly app kiva dusrya ekhadya knowledge denarya app vr online rahu aani answers bghun knowledge level vadhavu ......
Answer:
मी माझा मोकळा वेळ इंटरनेट/ मोबाइल गेम्स, फोन मध्ये घालवण्यापेक्षा,माझ्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करणार.मोबाइलवर वेळ घालवण्यापेक्षा मी एखादी नावीन कला किंवा विषय शिकण्यामध्ये वेळ घालवणार. असे केल्याने,मला नवीन गोष्ट शिकता येईल तसेच दुसऱ्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे, मला मोबाइलची आठवण नाही येणार.
मी माझा मोकळा वेळ माझ्या कुटुंबासोबत किंवा माझ्या मित्रांसोबत घालवणार.त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करणार,त्यांच्या बरोबर राहून नावीन गोष्टी शिकणार,त्यांच्याबरोबर बाहेर फिरायला जाणार.
मोकळ्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी मी मोबाइलपेक्षा एखादे पुस्तक वाचणार,त्यामुळे मला नवीन गोष्टी शिकता येतील.
मोबाइलचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी सुद्धा करता येतो,जसे की इंटरनेटमुळे आपल्याला विविध विषयांची माहिती मिळते,घरबसल्या काम करता येते.मी अशा गोष्टींसाठी मोबाइलचा वापर करून माझा मोकळा वेळ घालवणार.
Explanation: