India Languages, asked by bhaskarsutar01, 11 months ago

तुमचा छद कोणता ते सांगून तो जोपासण्यासाठी तुम्ही काय करता ते लिहा​

Answers

Answered by Prajwal10710
2

Answer:

तुम्ही तुमच्या पन्नाशीत पोचले आहात. तुमचे आयुष्य, करिअर अगदी स्थिरस्थावर आहे. आत्मपरीक्षण करण्याची, तुम्ही कमावले आणि काय गमावले हे बघण्याची तसेच अजून काय करता येईल हे ठरवण्याची ही एक चांगली वेळ आहे.

जसे जसे आयुष्य पुढे जाते, तसे तसे तुम्हाला जास्त मोकळा वेळ मिळू लागतो. या वेळेचा वापर तुम्ही अशा गोष्टी करण्यासाठी करू शकता ज्या तुम्हाला एकेकाळी करायच्या होत्या पण तेव्हा त्या करू शकला नाहीत.

एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते आणि आता जो वेळ तुम्हाला मिळाला आहे त्याचा वापर तुम्ही तुमचा छंद जोपासण्यासाठी करू शकता. छंदामुळे तुम्ही स्वतःला गुंतवून ठेऊ शकता, लोकांमध्ये मिसळू शकता, तुमच्या जुन्या आवडी-निवडी नव्याने जगू शकता. तसेच, छंद तुम्हाला उत्साही राहण्यास मदत करू शकतो. छंद जोपासण्यासाठी यापेक्षा योग्य वेळ तुम्हाला कधीच मिळणार नाही.

आम्ही खाली काही गोष्टी सुचवल्या आहेत ज्याने तुम्ही उत्साही जीवन जगू शकता:

1.स्वयंसेवक बना

जे समाजाकडून घेतले आहे, ते समाजाला परत देण्यासाठी तुम्ही एखाद्या सामाजिक संस्थेचे स्वयंसेवक बनू शकता. तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेत स्वयंसेवक बनू शकता. मग ते एखादे ऍनिमल शेल्टर असू शकते, किंवा मग तुमच्या जवळचे एखादे वाचनालय.

2. वाचन करा

वाचनामुळे फक्त तुमचे प्रबोधन होत नाही, तर ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून करू शकता. पुस्तक हा असा मित्र आहे, जो तुम्हाला तुमच्या प्रवासात, सुट्टीच्या दिवसांत पण सोबत देऊ शकतो. तुम्ही एखाद्या पुस्तकप्रेमींच्या ग्रुप मध्ये सामील होऊ शकता, ज्यामुळे तुमच्या ज्ञानात अधिक भर पडू शकते.

3. प्रवास करा

प्रवास करणे हा एक चांगला पर्याय आहे. मुलं स्तिरस्तावर झाली आहेत, कामाचे कोणतेही बंधन नाही त्यामुळे तुम्ही आता अशा ठिकाणी जाऊ शकता जिथे तुम्ही एकेकाळी जाण्याचे ठरवले होते पण तुम्ही जाऊ शकला नाहीत. तुम्ही ट्रॅव्हल ब्लॉगिंग पण करू शकता आणि त्याद्वारे तुमचे सर्व अनुभव लोकांसोबत शेअर पण करू शकता.

4. वाद्य वाजवायला शिका

संगीत प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग असतो. संगीत ऐकणे हा एक आनंददायक अनुभव आहे आणि तोच अनुभव वाद्य शिकताना द्विगुणित होतो. वाद्य वाजविल्याने तुमची कलात्मकरित्या विचार करण्याची क्षमता वाढते तसेच तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते.

5. ब्लॉग लिहा

आपल्या आयुष्यात घडलेले किस्से सांगायला कोणाला नाही आवडत. ते नुसतेच सांगण्याऐवजी तुम्ही ते लिहून ब्लॉग वर प्रकशित करू शकता. ब्लॉगिंग मुळे तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयावर लिहिण्याचे स्वातंत्र्य मिळते.

6. युट्युबिंग

लोकांचा असा समज असतो कि युट्युबवर फक्त विडिओ बघता येतात पण असे नाही. तुम्ही तुमचे युट्युब चॅनेल सुरु करून त्यावर व्हिडीओज अपलोड करू शकता आणि युट्युबचा वापर छंद म्हणून करू शकता. त्याचबरोबर तुम्ही सोशल मीडिया बद्दल पण बरेच काही शिकू शकता.

जर तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यात थोडा बदल हवा असेल तर एखादा छंद जोपासणे केव्हाही चांगलेच! कोणत्याही वयात आयुष्याचा समतोल साधणे आवश्यक असते पण उतारवयात याची गरज जास्त असते.

Similar questions
Math, 5 months ago