तुमचा एखादा ट्रेकिंग चा अनुभव स्पष्ट करा
Answers
Answer:
तुम्हाला गिर्यारोहणावेळी आलेला एखादा थरारक अनुभव कोणता?
ट्रेकिंग दरम्यान तुम्हाला आलेला एखादा थरारक अनुभव काय होता?
विनंती प्रश्नासाठी खूप आभारी आहे. या प्रश्नावर बाकी दोन जणांचे उत्तर वाचले मज्जा आली वाचतांना आणि स्वतःसोबत घडलेल्या प्रसंगाची पण आठवण झाली
तारीख १ जानेवारी २०१६ नववर्षाचा पहिला दिवस. बरेच दिवसापासून ऑफिस मधली मित्र कंपनी ट्रॅक च्या प्लॅन करत होतो अखेर नव्या वर्षात काहीतरी हेलधी रिसोल्युशन करूया या विचाराने ट्रॅक चा प्लॅन केला. आम्ही सगळे जण खुप उत्साही होतो. आमची जवळपास ८ जणांची टीम तयार झाली आणि ट्रॅक च्या एक आठवड्याअगोदर सर्व तयारी पण सुरु झाली. म्हणजे शूज , पाणी, ट्रॅक रॉड वगैरे वगैरे...
सर्वांच्या संमतीने आम्ही तोरणा किल्ला सर करण्याचे ठरवले. माझ्या माहितीनुसार तोरणा हा सर्वात उंच किल्ला आहे. मला पुण्याला स्थायिक होऊन आता १४ वर्ष होतील पण मी सिंहगढ सोडला तर कुठल्याही किल्ल्यावर गेलो न्हवतो.
ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व ट्रॅकर सकाळी ६ वाजता कात्रज ला एकत्र आलो आणि बाईक ने किल्ल्याजवळचे खालचे गांव गाठले सकाळी तर्रीदार मिसळ पाव खाऊन आम्ही तळ्याच्या गावातच जेवणाची ऑर्डर दिली (इथे हे लोक आपल्याला जेवण वर आणून देतात - जेवणाच्या वेळेपूर्वी )
सकाळचे ७.३० वाजले आणि आम्ही ट्रॅक ला सुरुवात केली सुरुवातीला तर खूपच जवळ वाटले नंतर जशेजशें अंतर पार केले तशे लांबच लांब वाटू लागले. शरतेअंती आम्ही जवळपास साडेतीन तासानंतर वर पोचलो आम्ही प्रत्येकी ने सोबत आणलेले २ लिटर पाणी संपायला आलेले पण नशीब चांगले कि वर पोचल्यावर आम्हला पाणी आणि ताक विकणारे लोकं मिळाले...