India Languages, asked by mouhp1, 3 months ago

तुमचा मित्रा किंवा मैत्रिण अडचणीत असताना तुम्ही कशी मदत कराल​
please answer no scam

Answers

Answered by nelakurthib
0

Answer:

I didn't get the answer to the question

Answered by mnarvekar16
1

Here's your answer:

▪ खूप आजारी असलेल्या एखाद्या मित्राला तुम्ही भेटायला जाता तेव्हा त्याचे बोलणे लक्ष देऊन ऐका व खऱ्‍या मनाने त्याला सहानुभूती दाखवा. लगेच त्याला सल्ला द्यायला सुरू करू नका किंवा असे वाटून घेऊ नका, की तुम्ही त्याला काही न काही उपाय सांगितलाच पाहिजे. या गडबडीत तुम्ही अजाणतेत काहीतरी असे बोलून जाल ज्यामुळे तुमच्या मित्राच्या भावना दुखावल्या जातील. तुमच्या आजारी मित्राला उपाय नकोत; तर त्याला कोणीतरी असा हवा असतो जो त्याचे बोलणे मनमोकळेपणाने व लक्षपूर्वक ऐकेल.

त्याला त्याच्या मनातील भावना मुक्‍तपणे बोलून दाखवू द्या. मधेमधे बोलून त्याची परिस्थिती क्षुल्लक लेखू नका. अनिकेत म्हणतो: “मला बुरशीजन्य मेंदूचा विकार झाला होता आणि त्यामुळे माझी दृष्टी गेली. कधीकधी मी खूप हताश होतो आणि माझे मित्र मला असं बोलून सांत्वन देतात की ‘या जगात काय फक्‍त तुलाच समस्या आहेत? असे कितीतरी लोक आहेत ज्यांची परिस्थिती तुझ्याहूनही बेकार आहे.’ पण माझ्या या मित्रांना एक कळत नाही, की माझी परिस्थिती क्षुल्लक लेखल्याने मला काहीच फायदा होत नाही. उलट, त्याचा माझ्यावर विपरीत परिणाम होतो. मी आणखी निराश होतो.”

तुमच्या मित्राला ही खात्री असली पाहिजे, की त्याने त्याच्या भावना बोलून दाखवल्यावर आपण त्याची टीका करणार नाही. त्याने जर म्हटले, की त्याला भीती वाटते, तर भ्यायचे काही कारण नाही, असे त्याला सांगण्याऐवजी, अशी भीती वाटणे साहजिक आहे, हे मान्य करा. अपूर्वाला कॅन्सर झाला आहे. ती म्हणते: “तब्येतीचं टेन्शन घेऊन जेव्हा मी रडू लागते तेव्हा त्याचा अर्थ असा होत नाही, की देवावरचा माझा भरवसा उडाला आहे.” तुमचा मित्र जसा आहे तसा त्याला स्वीकारायचा प्रयत्न करा, तुम्हाला जसा हवा आहे तसा त्याला बनवायचा प्रयत्न करू नका. त्याचे मन जरा हळवे झाले असेल. त्यामुळे तुम्ही त्याला काहीही सांगितले तर त्याला कदाचित लगेच वाईट वाटू शकेल, तो पहिल्यासारखा वागत नाहीए, या सर्व गोष्टी विचारात घ्या. सहनशील असा. तो एकच गोष्ट सारखी-सारखी सांगत असला तरीपण ती ऐकून घ्या. (१ राजे १९:९, १०, १३, १४) त्याला नेमके काय होत आहे हे त्याने तुम्हाला सांगितलेच पाहिजे, असे कदाचित त्याला वाटत असेल.

▪ तुमच्या आजारी मित्राबद्दल तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर तुमचे बोलणे व तुमची कार्येही सकारात्मक असतील.

Explanation:

hope this will help u...

Similar questions