India Languages, asked by shrutigole1, 1 month ago

तुमचा मते रेलवे प्रवासाचे असलेले फायदे व तोटे लिहा​

Answers

Answered by sarveshshah9333
11

Answer:

Plz mark me as brainlist.

Explanation:

रेल्वे प्रवास आपल्याला कमी वेळात मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास मदत करतो.रेल्वे प्रवास कमी पैशात केला जाऊ शकतो.ट्रेनच्या खिडकी जवळच्या सीट मधून सुंदर निसर्ग अनुभवता येतो.आपल्याला वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागत नाही. लांबच्या प्रवासासाठी रेल्वे प्रवास खूप मजेदार असतो.आपल्याला झोपण्यासाठी व बसण्यासाठी पुरेशी जागा तसेच चादरी आणि उशा सुद्धा मिळतात. फायद्यांबरोबरच रेल्वे प्रवासाचे काही तोटेही आहेत. ट्रेनमध्ये होत असलेल्या जास्त गर्दीमुळे रेल्वेचा प्रवास अधिक सोयीस्कर नसतो.तरुण, ट्रेनमध्ये स्टंट करण्याचा प्रयत्न करतात,जेणेकरून बरेच रेल्वे अपघात होत आहेत. काही वेळा,ट्रेन वेळेवर येत नाही ज्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो व वेळेवर त्यांची महत्वाची कामे होत नाहीत. रेल्वे शौचालय स्वच्छ नसतात.कधी कधी काही तांत्रिक बिघाडामुळे ट्रेन थांबते व यामुळे वेळेची बर्बादी होते व लोकांना त्रास सहन करावा लागतो.

Answered by Anonymous
12

Required Answer:-

रेल्वे प्रवासाचे फायदे:

  • रेलवे ने प्रवास केल्यास जिथे जायचे तिथे लवकर पोहोचतो.
  • रेल्वे चा प्रवास धोकादायक नाही.
  • रेल्वे मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नसते.
  • रेल्वे प्रवासाचे पैसे इतर वाहनं पेक्षा कमी असतात.

रेल्वे प्रवासाचे तोटे:

  • रेल्वे मध्ये आपल्याला कधी कधी बसायला जागा नसते एवढी गर्दी असते.
  • रेल्वे मध्ये प्रवास करायला पहिलेच रिझर्व्हेशन करावे लागते.
  • रेल्वे कोणासाठी थांबत नाही आणि ज्या त्या टाइम मध्ये आपल्याला स्टेशन वर जावे लागते.
Similar questions