India Languages, asked by spawarseema, 6 months ago

तुमचा प्रवासातील एखादा लक्षात राहिलेला अनुभव लिहा​

Answers

Answered by samikshajadhav16
86

Explanation:

एकदा मी मुंबई व्ही.टी. वरुन पंचवटी एक्सप्रेसने नाशिकला येण्यासाठी एसी फर्स्ट चेअरकारमधे होतो. दादरला एक सुशिक्षित सरदारजी कुंटु्ंब चढले. बहुदा ते परदेशातून आले होत असे त्याच्या सामानाच्या टॅगवरुन वाटते. त्यांत तीन पुरुष होते पैकी एका ज्येष्ठाने मोठी बॅग डोक्यावरील रकान्यात ठेवण्याचा प्रयत्न करीत होता पण ती नीट बसणे शक्य नव्हते. खाली बसलेले इतर त्याला सांगत होते की बॅग खाली ठेव, डोक्यावर पडली तर पंचाईत होईल. पण त्याचे एकच म्हणणे होते मैनाे टाईट बिठाई है, गिरेगी कैसे. मला राहावले नाही - मी ३ रांगा मागे होतो त्याला प्रेमाने सांगितले बाबूजी बॅग अभी तो ठीक बैठी हे लेकिन जब स्पीड ब्रेकर आएगा तो ट्रेन उछलकर बॅग आपहीके सरपे गिरेगी. आणि आश्चर्य किंवा माझे वय व पांढरे केस पाहून त्याला ते पटले आणि त्याने बॅग खाली ठेवली. बाकीचे प्रवासी गालांतल्या गांलांत हसत होते - मी खूणेने त्यांना चूप बसण्यांस सांगितले. ते कुटुंब देवळालीला उतरेपर्यंत माझ्या पोटांत गोळा उठलेला होता. माझा वात्रटपणा लक्षांत आला असता तर त्याने रागाने मला चालत्या गाडीतून खाली फेकले असते. देवळाली नंतर मात्र सगळे मनापासून मोकळेपणाने हसले. त्यातील प्रवासी परत कधी भेटले तर अजूनही त्या प्रसंगाची आठवण काढतांत

Answered by dashrathwaragade
15

Explanation:

तुमचा प्रवासातील एखादा लक्षात राहिलेला अनुभव लिहा

Similar questions