तुमचा साडे प्रजासत्ताक दिन साजरा साजरा करतात हालात या विषयावर बातमी तयार करा
Answers
Answer:
नवी दिल्ली: भारताचा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी साजरा केला जातो. अनेकांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन दिवसांमधला फरक ठळकपणे विचारला तर सांगता येत नाही. भारताचे नागरिक म्हणून प्रत्येकाला प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो, हे माहित असायला हवे.
Explanation:
भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. त्यामुळे हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. मात्र १९३० साली २६ जानेवारीला लाहोर येथे काँग्रेसचे जे अधिवेशन झाले, त्यातच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. याच अधिवेशनात तिरंगा ध्वजही फडकावण्यात आला. या दिवसाची आठवण म्हणून याच दिवशी राज्यघटना अंमलात आणण्याचे निश्चित करण्यात आले.
स्वातंत्र्यांनंतर सार्वभौम भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम तब्बल २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस सुरू होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीने राज्यघटनेचा मसुदा तयार केला. हे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी स्वीकृत करण्यात आले. देश १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला असला तरी २६ जानेवारीपासून भारताचं लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने सुरू झालं. भारत या दिवशी लोकशाही, सार्वभौम, गणराज्य बनला. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.