तुमचा शाहिद वाचन प्रेरणा दिवस उत्साह राज साजरा झाला ची बातमी तयार करा
Answers
विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांबद्दल उत्सुकता निर्माण करण्यासाठी उपक्रम
म. टा. वृत्तसेवा, पालघर
पालघर जिल्हा परिषदेच्या डहाणू तालुक्यातील प्राथमिक शाळा आगवन शिशुपाडा येथे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
भारतरत्न माजी राष्ट्रपती मिसाइल मॅन, थोर वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व विशद करताना डॉ. कलाम यांच्या 'अग्निपंख' या पुस्तकाची माहिती वरुणाक्षी आंद्रे यांनी विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांना वाचनालयातील पुस्तकांची ओळख व्हावी, यासाठी 'पुस्तकांचा खजिना' या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.कलाम यांच्या प्रतिमेचे व पुस्तकांचे पूजन शमिसाळ व जमादार या शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. 'वाचाल तर वाचाल', 'शिकाल तर टिकाल', 'ज्ञानाची पाहिजे खात्री, तर पुस्तकांशी करा मैत्री' या संकल्पना यावेळी उदाहरणे देऊन स्पष्ट करण्यात आल्या. शिक्षक व विद्यार्थी यांनी पुस्तकांचे वाचन केले.
पुस्तकांचा हा खजिना पाहून विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाल्याचे चित्र होते. यामुळेच शाळेतील शंभर टक्के विद्यार्थी आता वाचनालयाचा आनंद घेतील, अशी आशा शिक्षकांनी व्यक्त केली. वाचनालयात नवनवीन पुस्तकांचा समावेश करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थी आपल्या वाढदिवसाला चॉकलेटऐवजी आपल्या नावे शाळेतील वाचनालयाला पुस्तक भेट देणार आहेत. दररोज कमीत कमी अर्धा तास पुस्तकांचे वाचन करणार असल्याचे, तसेच वाचनप्रेमी पालकांसाठीही शाळेतील वाचनालय खुले केल्याचे शाळेतर्फे सांगण्यात आले.
सामाजिक कार्यकर्त्या उषा अनिलकुमार कर्नावट यांच्याकडून ग्रंथालयाला कपाट भेट देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उमेश सोंळके यांनी उपस्थिती सर्वांना 'वाचन प्रेरणा दिना'च्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली.