तुमचा विद्यालयात झालेला विज्ञान दिवसाचा वृतांत लिहा
Answers
Answered by
2
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जेलरोडवरील वनिता विकास मंडळ प्रशालेच्या माध्यमिक विनय मंदिर या शाळेत विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन गुरुवारी पार पडले. या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला आणि चिकित्सक वृत्तीला चालना मिळाली. प्रदर्शनाचे उद्घाटन तुषार बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली पालक वत्सला यशोद यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शाळेतील इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोगकृती मांडलेल्या होत्या. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या वैज्ञानिक प्रयोगांना भेट देऊन त्याची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी विज्ञान शिक्षिका सरिता पाचपांडे यांनी आपल्या स्मृती प्रित्यर्थ या विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली.
Similar questions