तुमच्या आवडत्या छंदाची माहिती पाच ते सहा ओळीत लिहा
Answers
Answer:
माझा आवडता छंद
लहानपणी मला घरात कोणी रागावले तर मी पुस्तक घेऊन बसत असे. त्यातली चित्रे बघत बसे. मला बडबड गीते, बालगीते, गंमत गाणी खूप आवडत असत. मी अशी गाणी, कविता पुन्हा पुन्हा वाचत असे. माझे नाव सोनाली. एकदा वाढदिवसाला मला आईने माझी आवड बघून 'मंगल गाणी-दंगल गाणी' हे गाण्यांचे पुस्तक भेट दिले. त्यातली सुंदर-मधुरगाणी मी मी कितीतरी वेळा वाचली, तोंडपाठ केली. तेव्हापासून कविता वाचण्याचा छंद मला लागला.
आजकालच्या मुलांना व माझ्या मित्रांना वाचनाचा कंटाळा येतो. कविता, गाणी तर कोणीही वाचत नाही. उलट माझे मित्र तर टी.व्ही., व्हिडिओ व मोबाईलवर खेळ खेळण्यात दंग असतात. 'जितकी माणसं तितके छंद' दुसऱ्याच्या छंदाला आपण का नावे ठेवा? माझ्या वया व ज्ञानाबरोबरच कविता, गाणी वाचण्याचा माझा छंद वाढू लागला. वेळ मिळेल तेव्हा मी गोष्टीची पुस्तके, प्रवासवर्णने, विज्ञान कथा ही वाचू लागले. पण जो आनंद मला कविता व गाणी वाचताना, गाताना होतो तो अवर्णनीय आहे. मी मराठी बरोबरच हिंदी व इंग्रजी कविता व गाणी वाचू व गाव लागले.
कविता वाचनाच्या छंदामुळे "कानोकानी कुजबुजताना