तुमच्या आवडत्या गायकाविषयी माहिती लिहा।
मराठी मधून।
Faster plz..
Answers
Answer:
भारतात लोकांना मिखा, हनी सिंग ,बादशाह सारखे पार्टी वाले गाणी आवडतात . पण अमित त्रिवेदी सारखा ओरिजनल संगीत देणारा , विलक्षण बुद्धिवंत ,क्रिएटिव्ह, प्रयोगशील संगीतकार प्रसिध्दी मानाने खूपच कमी लोकांना माहित आहे .
भारतात एका पेक्षा एका संगीतकार झाले असले तरी वयाने मोठे होऊ तसे एक गोष्ट कळते ही बहुतेक गाणी परकीय , पश्चिमात्य संगीतातून सरळ सरळ उचलली आहेत. त्यामुळे मला भावणारा संगीतकार म्हणाजे नव्या पिढीचा अमित त्रिवेदी. मूळचा मुंबईचा गुजराती कुटुंबातून आलेले अमित ची गाणी लोकांच्या मनावर राज्य करतात.
Dev D 2009 मध्ये रिलीज झाला आणि त्याची सुंदर गाणी प्रसिद्ध झाली. नंतर wake up sid मधला इकतर, लुटेरा मधील जिंदा, मन मर्जिया नी अमाप प्रसिद्धी मिळवली. पाकिस्तान कोक स्टुडिओ भारतात खूपच लोकप्रिय असला तरी भारतातल्या कोक स्टुडिओ खरी प्रसिध्दी मिळवून दिली अमित त्रिवेदी नी.
अमित यांची तुलना आर डी बर्मन शी होऊ शकते.त्यांची गाणी अपारंपारिक सदरात मोडणारे असतात. त्यांनी जास्त काम केले अनुराग कश्यप बरोबर , कश्यप सुद्धा अपारंपारिक चित्रपट बनवण्यात हातखंडा असणारे.
लोकगीते च ठेका धरणारे आणि folk पासून प्रेरित.
इकतारा सोडले तर त्यांचे कोणतेही गाणे लगेच लक्ष ओढवून घेणारे नसतात. पण जिंदा, मनमर्जी सारखे गाणे नंतर तुमचा मनात कैक वर्ष रेंगाळत राहतील ऐवढे मात्र नक्की.
ते स्वतः एक उत्तम गायक आहे पण त्यांनी इतर गायक सारखे जास्त गाणी गायली नाहीत.