Biology, asked by parijaiswal355, 10 days ago

(५) तुमच्या भावाला परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा.पत्र लिखिए उसका आंसर दीजिए ​

Answers

Answered by sp7935086
1

Answer:

i dont ni hindi soryyyyyyy

Answered by mad210216
4

पत्र लेखन.

Explanation:

३०१, शालीमार हाइट्स,

जय हिंद कॉलनी,

पंचवीर नगर,

बोरीवली.

दिनांक: २९ ऑक्टोबर,२०२१

प्रिय रंजीत,

सप्रेम नमस्कार.

कसा आहेस तू? मी इथे ठीक आहे. आशा करते की तू सुद्धा ठीक असणार.

आज मला बाबांच्या पत्रातून कळले की तुला अकरावीच्या परीक्षेत खूप चांगले गुण मिळाले आहेत. हे वाचून मला खूप आनंद झाला आणि तुझे अभिनंदन करण्यासाठी मी हे पत्र लिहत आहे.

मला माहित आहे की तू परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली होती आणि शेवटी तुला तुझ्या मेहनतीचे फळ मिळालेच. आता पुढच्या वर्षी तू बारावीत जाणार, म्हणून तुला आणखी जास्त अभ्यास करायला लागणार.

मला खात्री आहे की तू मन लावून अभ्यास करत राहणार आणि चांगले गुण मिळवत राहणार. पण, अभ्यासासोबतच बाहेर मित्रांसोबत खेळतसुद्धा जा, जेणेकरून तुझे मन प्रसन्न राहणार.

तुझी बहीण,

स्वप्नाली.

Similar questions