India Languages, asked by rp4270413, 2 months ago

तुमच्या गावातील एखादा व्यवसायिकाची कामाचे वर्णन​

Answers

Answered by vandanapargaonkar060
0

Answer:

व्यवसाय : (बिझ्निस्). वस्तूंचा वा सेवांचा समाजाला पुरवठा करणारी व्यवस्था. व्यवसायाचा संबंध आर्थिक मूल्य निर्माण करणाऱ्या सर्व प्रकारच्या संस्थांशी असतो. व्यवसायात समाविष्ट होणाऱ्या विभिन्न क्रियांचा नागरिकांच्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाशी निकटचा संबंध असतो. व्यवसाय या संज्ञेमध्ये संपत्ती निर्माण करण्याच्या तसेच संपत्ती मिळविण्याच्या उद्देशाने करण्यात येणाऱ्या सर्व क्रियांचा समावेश होतो. मात्र केवळ संपत्तीची निर्मिती वा संपादन हे व्यवसायाचे एकमेव उद्दिष्ट नव्हे, तर सामाजिक उपयोगितेच्या दृष्टीने मानवी गरजांची पूर्तता करणे, हेही व्यापक उद्दिष्ट असते. व्यवसाय या सुसंघटित प्रक्रियेचे दोन पक्ष असतात व त्या दोहोंचे परस्परहित साधणे आवश्यक असते.

व्यवसायामध्ये एकमेकांच्या फायद्यासाठी वस्तूंची किंवा सेवांची देवाणघेवाण केली जाते. व्यवसाय ही सातत्याने व अखंडपणे चालणारी व पुनरावृत्त होणारी क्रिया असल्याने एखाद्या व्यक्तीने महिन्याकाठी, वर्षाकाठी किंवा संपूर्ण आयुष्यात एखाद-दुसऱ्या वेळी ही क्रिया केल्यास तिला व्यवसाय असे म्हणता येणार नाही. सतत वाढत जाणाऱ्या असंख्य मानवी गरजा भागविण्याच्या उद्देशाने उत्पादनाचे घटक संघटित करून व्यवसायामार्फत वस्तूंची वा सेवांची निर्मिती केली जाते. एका व्यक्तीने किंवा संघटनेने नफा मिळावा यासाठी आर्थिक क्रिया केली की, त्यास व्यवसायाचे स्वरूप प्राप्त होते.

Similar questions