तुमच्या घरी 'होळी 'कशा पद्धतीने साजरी करतात ते लिहा?*
Answers
Answer:
भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये होळी सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. रंगांचा सण म्हणून होळीची ओळख वेगळी आहे. फाल्गुन पौर्णिमेनंतर वसंतोत्सवाला वा वसंत ऋतूला सुरुवात होते. होळी सण उत्तर भारतामध्ये विशेष उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते. फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण साजरा करण्याची पद्धत थोडी हटके आहे. पाहूया राज्यात कशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो.होळी उत्सवाला 'होलिकादहन', 'होळी', 'शिमगा', 'हुताशनी महोत्सव', 'दोलायात्रा', 'कामदहन' अशी वेगवेगळी नावे आहेत. कोकणात याला 'शिमगो' म्हणतात. वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त 'वसंतोत्सव' असेही याला म्हटले जाते. देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने याला सुग्रीष्मक असे नाव दिले आहे. यातूनच 'शिमगा' असा अपभ्रंश तयार झाला असावा, असे मानले जाते.