तुमच्या घरापासुन ते तुमच्या भागात तो कचरा जिथे जातो तेथपर्यताचा सुक्या कचर्याचा प्रवाश लिहून काढा
Answers
Answer:
ओला कचराः पाला पाचोळा, भाजीपाल्याचा कचरा, फळ-फुलांचा कचरा, लाकडाचा भुसा, नखे, केस, खरकटे अन्न, हाडे, मांस, माशांचे काटे, नारळ, शहाळे करवंट्या.
कोरडा कचराः कोरडा कागद, पुठ्ठा, प्लास्टिक, धातू, कापड, चिंध्या, रेग्झिन, थर्माकोल, रबर, काच, ई-कचरा.
घातक कचराः सुया, सिरिंज, जुनी औषधे, इंजेक्शनच्या न उकळलेल्या सुया, डायपर्स, सॅनिटरी पॅड्स, औषध-उपचारांसाठी वापलेला कापूस, बॅटरी सेल्स, रंग, रसायने, तुटलेले बल्ब, ट्युबलाइटस्, कीटकनाशके, जंतुनाशके हा विषारी कचरा वेगळा ठेवा.
कचऱ्याचे उपप्रकारः रंगीत पोस्टर्स, साधे कागद, पुठ्ठा, सिगारेट, साबण, सौंदर्य प्रसाधनाची वेष्टने, पुस्तके, मासिक, वर्तमानपत्रे, ब्राऊन पेपर, पेपर कप, प्लेटस्.
प्लॅस्टिकचा कचराः दूध आणि तेलाच्या पिशव्या, पाणी साठवण्याच्या बाटल्या, पाइप्स, नायलॅान ब्रश, वायर्स, जाळ्या इंजेक्शन सिरिंज, ग्लुकोज बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, एक्सरे स्कॅन फिल्मस, कप-बशा, घरगुती वापराच्या कुंड्या. पेन रिफिल्स.
काय करायला हवे...
शून्य कचरा ध्येयः शून्य कचरा म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा संपूर्ण विचार. वस्तू वाया घालवण्याचे प्रमाण कमी करणे, सवयी बदलणे, हाताला वळण लावणे, स्वतःला शिस्त लावणे, सार्वजनिक स्वच्छतेची मूल्ये जपणे.
वस्तूंचा वापर कमी कराः चाळीस मायक्रॉनखालील प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळणे, वस्तूंची वेष्टने कमी करणे.
वस्तू पुन्हा वापरणेः ‘वापरा आणि फेका’ ऐवजी ‘वापरा आणि पुन्हा वापरा’ अशी सवय लावून घ्या. प्लास्टिक डबे, बाटल्या अशा वस्तू आपण पुन्हा वापरल्या पाहिजे. वापरलेले सर्व कागद कोरडे ठेवणे, पाठमोरे कागद वापरणे, कुठल्याही कागदाच्या वा प्लास्टिकच्या पिशव्यांचे तुकडे न करणे, वापरलेली पाकिटे-पिशव्या पुन्हा वापरणे, काचेचे ग्लास व कप वापरणे, जुन्या वस्तू कचऱ्यात टाकू न देणे, वस्तू दुरुस्त करून वापरणे.
वापरलेल्या वस्तूंपासून पुननिर्मिती कराः कचरा वेगळा ठेवा. काच, धातू, प्लास्टिक, कागद, शाम्पू, गुटखा यांचे सॅशे, बिस्किटे, गोळ्या, चॅाकलेट यांची वेष्टने हा कोरडा व ओला कचरा वेगळा ठेवला तर कोरडा कचरा स्वच्छ राहतो. पुनर्निमितीसाठी त्याचा वापर होणे शक्य होते.
कचरा नष्ट कसा करता येईल..
उद्योगधंद्यातून तयार होणारी मळी किंवा मिश्रण यात विषारी धातू, तेल, घातक रसायने असतात. यातील धातूंचा कचरा लिलाव करून कंत्राट देऊन विकला जातो. या कचऱ्याचे वर्गीकरण करून तो नष्ट करण्याची सक्ती उद्योजकांवर हवी.
वैद्यकीय कचराः हा कचरा नष्ट करण्यासाठी तो पिवळ्या रंगाच्या पिशवीत घालून त्याची शास्त्रीय विल्हेवाट लावण्यात यावी. निर्जुंतीकरण करून हा कचरा नष्ट करायला हवा. मोठ्या ज्वलनभट्ट्या तसेच मायक्रोव्हेवमध्ये हा कचरा नष्ट करता येतो.
बांधकामांचा कचराः विटा, धातू, लोखंडी सळ्या, खिडक्या, दरवाजे, पत्रे, लाकूड यांची विभागणी करून विल्हेवाट लावा, बांधकामांच्या कचऱ्यापासून विटा तयार करण्याचे तंत्र वापरा, सिमेंट-विटा एकत्र करून त्याचा चुरा करून उपयोग भराव घालून प्लॅटफॅार्म किंवा विभाजक बनवण्यासाठी वापरता येतो.
सॅनेटरी कचराः सॅनेटरी कचऱ्यात प्लास्टिकचे तंतू किंवा लाकूड लगदा वापरलेला असतो. पॉलिप्रॉपलीन आणि पॅालिइथिलीनच्या दोन स्तरांमध्ये लाकडाचा लगदा घातला जातो. हा कचरा कागदामध्ये वेगळा बांधून टाका.
हे करता येणे शक्य आहे...
निसर्गदूत भेटः घरच्या घरी कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी ‘स्त्री मुक्ती संघटनेने’ तयार केलेल्या ‘निसर्गदूत’ बास्केटची मदत घ्या. अत्यल्प दरामध्ये या बास्केटच्या मदतीने ओला कचऱ्यापासून उत्कृष्ट खत उपलब्ध होते.
सोसायट्यांमध्ये सात दिवसांचे सात आयताकृती सिमेंटचे खड्डे तयार करून घ्या, त्या प्रत्येकावर घट्ट जाळी लावून सोसायटीतील ओला कचरा दिवसांप्रमाणे त्यात टाका, त्यात विकराचे द्रवरूप पाणी शिंपडून दुर्गंधीविरहीत खत मिळू शकते.
स्वयंपाकघरात निर्माण होणारा कचरा उरतो. त्यावर आपण घरच्या घरी प्रक्रिया करू शकतो. त्यासाठी साधारण वीस लिटर क्षमतेच्या दोन बादल्या घ्या. या बादल्यांना झाकणे असावीत. या झाकणाला आतून मच्छरदाणीसारखी जाळी पक्की बांधून वरच्या बाजूला ८ ते १० टिकलीच्या आकाराची छिद्रे पाडावीत. त्या बादलीच्या तळाशी नारळाच्या शेंड्या अंथरून त्यांची गादी करावी. नारळाच्या शेंड्या मिळाल्या नाहीत तर वाळलेली पाने टाकावीत.
या बादलीत आपण घरातील खरकटे, उरलेले किंवा खराब झालेले अन्न, फळांच्या साली, भाज्यांचे देठ व खराब भाग टाकू शकतो. दुसऱ्या दिवशी कचरा टाकताना झाकण उघडून, शेंड्या बाजूला करून कचरा टाकावा व पुन्हा त्या शेंड्या पसरून ठेवाव्यात. पाण्याची आवश्यकता असल्यास त्यावर पाणी शिंपडावे. घरच्या घरी खतनिर्मिती करणे शक्य आहे.
Explanation: