CBSE BOARD X, asked by shaikhmustakali2, 1 day ago

तुमच्या घरी येणाऱ्या कामवाल्या मावशीचा
अनुभव थोडम्यात सोग​

Answers

Answered by Anonymous
13

\huge\underbrace\pink{Answer}

नाशिक : 'कामावार असताना कोणी आम्हाला 'ताई' म्हणते, तर कोणी मावशी. माझ्यासारख्या हजारो महिला अनेक घरांत धुणीभांडी करतात. करोना संकटामुळे आता काम गेलेच आहे. त्याचबरोबर आपुलकीचे शब्दही लुप्त झाले आहेत. त्यांच्यासाठी आता आम्ही आहोत फक्त 'कामवाली बाई'. लोक केवळ कामापुरतेच गोड बोलतात हे करोना संकटाने आम्हाला दाखवून दिले आहे. आम्हाला घरात प्रवेश बंद झालाच, परंतु अनेक कुटुंबांनी घरकाम करणाऱ्या महिलांचा पगार देणेही टाळले,' असे क्लेशदायक अनुभव अलका जेजूरकर कथन करतात. काम अन् दामही गेल्याने अनेक मोलकरणींच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

जेजुरकर या मेरी म्हसरुळ परिसरात गेल्या २२ वर्षांपासून त्या धुणीभांडी आणि स्वयंपाकाचे काम करतात. लॉकडाउनमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. त्याचा फटका धुणीभांडी करणाऱ्या, चपात्या लाटणाऱ्या आणि स्वयंपाक करणाऱ्या महिलांनाही बसला आहे. या महिला मुळातच कष्टाळू. धुण्या-भांड्यांचे ६०० ते ७०० रुपये मिळतात. आठ दहा घरांची कामे करण्यात दिवस संपतो. त्यातून महिनाभराचा घरखर्च भागेल एवढे पैसे मिळतात. परंतु, करोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. ज्या महिलेला आठ-दहा घरांची काम सुरू होती त्यांच्याकडे सद्यस्थिती अवघ्या दोन तीन घरांची कामे उपलब्ध आहेत. करोना संकट येण्यापूर्वी आम्ही ताई, मावशी होतो. परंतु आता आम्ही फक्त कामवाली बाई आहोत. काही लोकांनी पूर्ण पगार दिला. काहींनी ६०० ऐवजी ५०० रुपयेच दिले. काहींनी तर वातावरण निवळल्यावर पैसे देऊ. काही दिवस पुन्हा इकडे फिरकू पण नका असे सांगत पिटाळून लावले. लोकांनी स्वतःच्या उदरनिर्वाहाची काळजी वाहत आमचे पैसे देण्याचे टाळले. आमच्या पोराबाळांसाठी, घरखर्चासाठी आम्हाला पैसे नकोत का, असा सवाल जेजुरकर उपस्थित करतात. आमच्या घामाचे दाम दिला जात नसल्याने आमची किंमत काम असेपर्यंतच होती का, असा सवाल महिला उपस्थित करतात. हा एकट्या जेजूरकर यांचाच अनुभव नाही. शहर आणि जिल्ह्यात धुणीभांडी करणाऱ्या बहुतांश महिलांची हीच स्थिती आहे. एरव्ही तुम्ही नाही आलात तर आमचे काय होईल, असे म्हणणारे लोक आता तुम्ही काही दिवस येऊच नका असे म्हणू लागले आहेत. ज्येष्ठ महिलांना काही कुटुंबांकडून तुच्छतेची वागणूक मिळत असल्याचा वाईट अनुभव येत असल्याचे जेजुरकर सांगतात.

-

कामाची शोधाशोध

धुणीभांडी करणाऱ्या महिला यांचे कामाचे परिसर ठरलेले आहेत. आपला परिसर सोडून अन्य परिसरात या कामासाठी जात नाहीत. परंतु अनेक महिलांचे काम गेल्याने त्यांच्यापुढे चरितार्थ चालविण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. इतर कोणाचा आधार नसल्याने या महिलांना काम शोधण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे महिला अन्य परिसरात जाऊनही धुणीभांडी, स्वयंपाकाचे काम मिळेल का, याबाबत विचारणा करू लागल्या आहेत.

-

राज्यभर १५ लाख घरकामगार

राज्यभर १५ लाख घरकाम महिला कार्यरत आहेत. २०११ मध्ये घरकामगार (मोलकरीण) सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन केले होते. त्या मार्फत मोलकरीण पाल्यासाठी शिष्यवृत्ती, वय वर्षे ५५ वरील कामगारांना १० हजार रुपये सन्मानधन, विमा, बाळंतपणासाठी मदत आदी योजना सुरू केल्या. परंतु, सरकारने आर्थिक तरतूद न केल्यामुळे मंडळाचे कामकाज ठप्प आहे. घरकामगार महिला बहुसंख्य विधवा, परित्यक्ता, पतीच्या व्यसनामुळे आर्थिक दुर्बलता या कारणाने पीडित आहेत. घर चालवण्यासाठी, मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी १२ ते १५ तास त्या काम करतात. हे कामही गेल्याने त्यांचे जगणे अधिक कठीण झाले आहे.

कामापुरती मावशी, आता कोणी दावेना ओळख!

जेजुरकर

Similar questions