India Languages, asked by gayu5765, 11 months ago

तुमच्या कुटुंबासाठी सहलीचे बुकींग करण्याची विनंती करणारे पत्र लिहा​

Attachments:

Answers

Answered by jigriy12
2

Answer:

  • Write a letter requesting a trip booking for your family
Answered by rajraaz85
14

Answer:

दिनांक:१४ नोव्हेंबर, २०२१

प्रति,

मा. व्यवस्थापक,

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, तारकपूर,

अहमदनगर-५४३२७६

विषय: संपूर्ण कुटुंबांचे अष्टविनायक दर्शनासाठी बुकिंग करण्याबाबत.

माननीय महोदय,

आम्ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तारकपूर या बस स्थानकाने दिवाळीच्या सुट्टी निमित्ताने अष्टविनायक दर्शन घेण्यासाठी प्रवाशांना जी सवलत दिली आहे ती जाहिरात बघितली.

जाहिरात बघितल्या बघितल्या आम्हाला खूप आनंद झाला. कारण आमचे पूर्ण कुटुंब अष्टविनायक दर्शनासाठी आतुर झाले होते. तुमच्या बस स्थानकाची सवलतीची जाहिरात बघून मी आणि माझ्या कुटुंबाने लगेच अष्टविनायक दर्शन घेण्यासाठी चा निर्णय घेतला.

मी आपणास विनंती करतो की १६ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीसाठी आमच्या कुटुंबातील चार सदस्यांचे अष्टविनायक यात्रेसाठीचे बुकिंग करावे ही विनंती. तिकिटाचे पैसे आणि प्रवाशांची नावे मी आपल्याला पाठवत आहे तरी लवकरात लवकर बुकिंग करावे ही नम्र विनंती.

तुमचे खरचं मनापासून आभार!

तुमचा विश्वासू,

अजय पाध्ये

Similar questions