तुमच्या मोहल्यात नवीन लसीकरण केन्द्र सुरू करण्यात आलेला अाहे त्याबाबत सुचना लिहा
Answers
बालकांमधील लसीकरणाव्दारे प्रतिबंध करता येणा़-या आजारांचे प्रमाण व त्या आजारांमुळे होणारे मृत्यु कमी करण्यासाठी नियमित लसीकरण कार्यक्रम सुरु करण्यात आलेला आहे. ऑक्टोबर १९७७ मध्ये लसीकरणाव्दारे प्रतिबंध करता येणा-या घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ व क्षयरोग या पाच आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ''विस्तारित लस टोचणी कार्यक्रम (विलटो)'' सुरु करण्यात आला. सन १९८५-८६ मध्ये ''सार्वत्रिक लसीकरण'' कार्यक्रम सुरु करण्यात आला. गोवर लसीचा समावेश सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमामध्ये करण्यात आला.
नियमित लसीकरण कार्यक्रमाच्या वेळापत्रकामध्ये हिपॅटायटिस बी या रोगाच्या लसीचा समावेश राज्यात सन २००८-०९ मध्ये टप्याटप्याने करण्यात आला. आता ही लस सर्व जिल्हयांमध्ये लागू करण्यात आली आहे. नियमित लसीकरण कार्यक्रमात जापनीज एन्सेफलायटिस या रोगाच्या लसीचा समावेश अमरावती (महानगरपालिकासहीत) यवतमाळ, नागपूर, भंडारा, वाशिम, गडचिरोली, लातूर आणि बीड जिल्हयात करण्यात आला. महाराष्ट्रात लसीकरणाच्या वेळापत्रकामध्ये सन २०११ पासून गोवर लसीच्या दुस-या मात्रेचा समावेश करण्यात आला.