CBSE BOARD X, asked by saurabhpatil77203, 9 days ago

तुमच्या मित्राला/मैत्रिणी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by mad210216
59

मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र.

Explanation:

सीमा बंगला,

हिमालया गार्डन,

पाल्म रोड,

बेलापुर.

दिनांक: ९ नोव्हेंबर, २०२१

प्रिय मैत्रीण स्नेहा,

नमस्कार.

कशी आहेस तू? तुझ्या कुटुंबातील सगळे कसे आहेत? मी आशा करते की तुम्ही सगळे ठीक असणार.

हे पत्र मी तुला तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लिहत आहे. मी देवाकडे हीच प्रार्थना करते की तुला जीवनात खूप यश, सुख आणि आनंद मिळत राहो.

यावर्षी तुझ्या वाढदिवसाला मी माझ्या परिक्षेमुळे येऊ शकणार नाही, त्यासाठी मला माफ कर. त्यामुळे या पत्राद्वारे शुभेच्छा पाठवत आहे.

थोड्या दिवसांनी मी तुला भेटायला येईल तेव्हा आपण खूप मजा करू. पत्रासोबत मी तुला एक सुंदर भेट पाठवली आहे, आशा करते की तुला ती भेट आवडेल.

तुझी मैत्रीण,

एकता.

Similar questions