Science, asked by PragyaTbia, 1 year ago

तुमच्या मित्राला सतत सेल्फी काढायचा छंद लागला आहे, तुम्ही काय कराल? का?

Answers

Answered by halamadrid
4

Answer:

जर माझ्या मित्राला सतत सेल्फी काढायचा छंद लागला असेल,तर अशा वेळी मी माझ्या मित्राला सतत सेल्फी न काढण्याचा सल्ला देणार.मी त्याला सांगणार कि,एखाद्या गोष्टीचा छंद असणे चांगले आहे,पण जर त्या गोष्टीचा अतिरेक केला तर ती गोष्ट घातक ठरू शकते.त्याचप्रकारे सतत सेल्फी काढत असल्यामुळे त्याला होणाऱ्या नुकसानाबद्दल मी त्याला सांगणार.

आपण कितीतरी बातम्या आजकल ऐकतो,ज्यामध्ये लोक सेल्फी काढण्यासाठी कुठल्या न कुठल्या धोकादायक जागांवर जातात,असे करत असताना त्यांना कधीकधी जीव गमवावे लागते,किंवा त्यांना गंभीर दुखापत होते.मी या गोष्टींची माहिती माझ्या मित्राला देणार.

सेल्फीवर जासतीत जास्त लाईक्स मिळवण्यासाठी किंवा आपली सेल्फी प्रसिद्ध होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जातात.सेल्फीमुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम पड़त आहे.तेव्हा,मी माझ्या मित्राला या गोष्टीबद्दलसुद्धा जागृत करणार.

अशा प्रकारे,मी माझ्या मित्राला सतत सेल्फी काढण्यापासून थांबवायचा प्रयत्न करणार.

Explanation:

Answered by pagars393
1

Answer:

त्याला सल्ला देइन की तु सतत सतत सेल्फी काढतजाऊ नको

अरे, मी काय म्हणत नही की तु काढू नको , हे धोकादायक होऊ शकतो.

मी त्याला हा सल्लाह देइल

Explanation:

,

Similar questions