तुमच्या मावस भावाला बहिणीला चित्रकला स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळले याबदूदल करणारे पत्र त्याचे तिचे अभिनंदन करणारे लिहा
Answers
Explanation:
.........................................
उत्तर :
★ अनौपचारिक पत्र
___________________
बी - 701
अजमेरा एरिया
कोरेगांव पार्क
पुणे - 411001
दिनांक - 09 ऑगस्ट, 2021
प्रिय सई,
कशी आहेस तू? मी इकडे मजेत आहे. तू तिकडे खुशाल आणि स्वस्थ असावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. अग!सोनू कालच मला मावशी चा फोन आला होता.
तिनेच मला सांगितले की, तुला चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळालेले आहे. ऐकून अतिशय आनंद झाला. तुझ्या या यशाबद्दल तुझे अभिनंदन.
सई, मला माहित आहे तुला चित्रकलेची आवड आधीपासूनच आहे आणि चित्रकलेचा छंद जोपासत त्यामध्ये तू अधिकाधिक यश संपादन करावे ही कामना करते आणि ते तू अवश्य करशील हे तर मला माहित आहे. चित्रकलेच्या या कौशल्यांमध्ये तू अधिकाधिक प्रगती करशील हे पण ठाऊक आहे.
मावशी आणि काका यांना माझा नमस्कार सांग. अर्णव दादाचा अभ्यास कसा चालू आहे? बाकी सुट्ट्यांमध्ये भेटल्यावर बोलू. पत्राच्या उत्तराच्या प्रतीक्षेत
तुझीच लाडकी ताई,
गौरी