तुमच्या मते खरी मैत्री कशी असते.
plz send me brifly
Answers
Answer:
Mala asa vatata ki Maitri mhanje ek mekanna samajhne
Answer:
प्रत्येक व्यक्तिला सर्वात जवळचा असा कुणी वाटत असेल तर तो म्हणजे मित्र. मित्राशिवाय मनातल्या भाव-भावनांना दुसरं कुणी समजून घेईल का? जरी कुणी समजून घेतलं तर त्याला मित्र व्हावं लागतं नाही का?
आपल्याला मित्र असावा असं प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे. पण मैत्री करताना पहिल्यांदा स्वतःच मित्र व्हावं लागतं. कुण्या अनोळखी व्यक्तीशी मैत्री जुळविण्यासाठी गरज असते ती स्वत:वर विश्वास ठेवण्याची, जाती-पातीची बंधने झुगारण्याची, संशयाचे काळे पडदे बाजूला सारण्याची, विशाल ह्रद्य, संवेदनशील मन जपण्याची, दुसर्यानां व्यवस्थितपणे समजून घेण्याची.
मैत्री व्हायला वेळ लागत नाही, पण खरा मित्र व्हायला वेळ लागतो! मैत्री म्हणजे दोन अनोळखी मनातुन निर्माण झालेले सुर! आणि खरा मित्र म्हणजे अनोळखी सुरातून निर्माण होणारे एक सुमधुर गाणं! मैत्री जुळते ओळखीमुळे, पण ओळख झाल्यानंतर त्या व्यक्तिच्या सान्निध्यात आल्यानंतर त्याच्या सुख-दु:खात सामील झाल्यानंतर जो "माणूस" तयार होतो तो खरा मित्र अन तिच खरी मैत्री!
खरे मित्र असतात ह्रद्याच्या ढासळलेल्या भिंतीना नव्यावे उभे करणारे कारागीर. आशेचे नवे नवे रंग देणारे रंगारी. मित्राच्या जीवनात प्रेरणा भरणारे प्रेरणास्तोत्र. मित्र वाईट मार्गाकडे जाताना रोखणारे, प्रसंगी टोकणारे, मित्राचे कौतुक करणारे! किती रुपं या मित्राची असतात नाही का?
मित्राचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे कर्ण. कर्णाचा मित्रासाठी त्याग, तो म्हणजे मित्रासाठीच वाट्टेल ते करणारा निश्रयी माणूस. दुर्योधनासारख्या वाईटाच्या मार्गी लागूनही त्याला अखेरपर्यंत न सोडणारा मित्र, त्याचा विश्वासघात न करणारा विश्वासू कर्ण. इतिहासात अजरमर होणारा असा हा कर्ण.
या दूषित जगात गंगेच्या पाण्याइतकाच निर्मळ असणार्या, मित्रांमधील मरगळ दुर करणार्या, गरज पडली की मेणाहून मऊ अन् वज्राहून कठीण बनणार्या मित्राची, मैत्रीची नितांत गरज आहे.
जगाचा थोडा विचार न करता, आपल्या मित्राच्या सुख्-दु:खालाच जग मानून त्याच्यासाठीच झ्टणार्या, आपल्याजवळ असणांर ज्ञान, आपल्या मित्रांसाठी देऊन त्याला उभं करणार्या, आर्थिक मद्द्त करणार्या कल्पव्रक्षाप्रमाणं असणार्या माणसातच खरा मित्र वसतो असं मला वाटतं आणि माणुसकीने भरलेल्या माणसाशी मैत्री व्हायला वेळ लागत नाही.
आजच्या बेरोजगारीच्या युगात तर गरज आहे, ती समाजाने बेकार ठरवलेल्या हुशार, सुशिक्षित 'सुदाम्या'ला मैत्रीखातर त्याच्याजवळ उंची पोहे जरी नसले तरीही त्याच्या एका 'कट चहा' वरूनच त्याची परिस्थिती जाणून घेऊन त्याला मदत करणार्या सखा श्रीकृष्णाची!
असा 'सखा श्रीकृष्ण' मित्ररुपात भेटण्यासाठी स्वतः सुदामा असावं लागतं व श्रीकृष्ण- सुदामासारखी अतूट मैत्री. एवढंच