तुमच्या मते खरी मैत्री कशी असते ते तुमच्या शब्दांत लिहा.
१० ते १२ वाक्य लिहा
【 no irrelevant answers required 】
Answers
Answer:
प्रत्येक व्यक्तिला सर्वात जवळचा असा कुणी वाटत असेल तर तो म्हणजे मित्र. मित्राशिवाय मनातल्या भाव-भावनांना दुसरं कुणी समजून घेईल का? जरी कुणी समजून घेतलं तर त्याला मित्र व्हावं लागतं नाही का?
आपल्याला मित्र असावा असं प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे. पण मैत्री करताना पहिल्यांदा स्वतःच मित्र व्हावं लागतं. कुण्या अनोळखी व्यक्तीशी मैत्री जुळविण्यासाठी गरज असते ती स्वत:वर विश्वास ठेवण्याची, जाती-पातीची बंधने झुगारण्याची, संशयाचे काळे पडदे बाजूला सारण्याची, विशाल ह्रद्य, संवेदनशील मन जपण्याची, दुसर्यानां व्यवस्थितपणे समजून घेण्याची.
मैत्री व्हायला वेळ लागत नाही, पण खरा मित्र व्हायला वेळ लागतो! मैत्री म्हणजे दोन अनोळखी मनातुन निर्माण झालेले सुर! आणि खरा मित्र म्हणजे अनोळखी सुरातून निर्माण होणारे एक सुमधुर गाणं! मैत्री जुळते ओळखीमुळे, पण ओळख झाल्यानंतर त्या व्यक्तिच्या सान्निध्यात आल्यानंतर त्याच्या सुख-दु:खात सामील झाल्यानंतर जो "माणूस" तयार होतो तो खरा मित्र अन तिच खरी मैत्री
ज्या मैत्रित वासना नसते आणि अपुलकी , विश्वास व प्रेम असते ती खरी मैत्री...
Answer:
माझ्या मते, खरा मित्र तोच असतो जो स्वतः कितीही सुखात असला तरी मित्राचे दुःख दूर केल्याशिवाय ते सुख स्वतः अनुभवत नाही. मैत्री ही अशी गोष्ट आहे जी निस्वार्थीपणे अथवा दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख पाहून केली जाते. फक्त मैत्री करुन चालत नाही तर ती टिकवून ठेवणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं.
Explanation:
Hope helps you