World Languages, asked by anacom, 1 month ago

तुमच्या परिसरात कोणकोणते बाजार भरतात? स्वमत for class 3 in मराठी. NO SPAM PLEASE
PLEASE DON'T GIVE SUCH ANSWERS​​

Attachments:

Answers

Answered by janavipatil1462006
1

आमच्या परिसरामध्ये गुरुवारचा बाजार बघतो आणि याव्यतिरिक्त आमच्या घराजवळ भाजीपाल्याच्या गाड्याही लागलेले असतात आणि आमच्या इथे गाडी हिकायला येतात याव्यतिरिक्त आमच्या परिसरात खूप सुखसोयी उपलब्ध आहेत भाजी मंडी आणखी छोटे छोटे मोठे छोटे मोठे भाजीपाल्याचे दुकान भरपूर सोयी आहे

Explanation:

प्लीज प्लीज प्लीज प्लीज फ्रेंड लिस्ट ला टच करा प्लीज

Answered by borate71
3

Answer:

आमच्या गावचा बाजार (आठवडा बाजार)

आमचे गाव म्हटले तर खेडे आणि म्हटले तर शहर आहे. आमच्या गावचा बाजार हा दर मंगळवारी भरतो. आजूबाजूच्या खेड्यातील शेतकरी आपले धान्य, भाजीपाला, फळे विकण्यासाठी घेऊन येतात. तसेच व्यापारी लोकही फळफळावळ आणि  धान्याच्या राशी बरोबर बाजारत आपले स्थान मांडून बसतात. शेतकरी हे स्वतःच्या कष्टाने पिकवलेली भाजी, धान्य स्वस्त व मापापेक्षा थोडे जास्त गिऱ्हाईकांना विकतात आणि दुपारीच भरलेल्या खिशाने परतीच्या प्रवासाला लागतात. व्यापारी लोक मात्र आपला माल खपण्यासाठी आपला माल किती चांगला आहे असे सांगून जास्त भावाने विकण्याचा प्रयत्न करत असतात.

बाजार हा प्रत्येक गावामध्ये भरतो. परंतु प्रत्येक गावात हा बाजार वेगवेगळ्या वाराला भरत असतो. त्याप्रमाणे गावातील लोक खरेदीसाठी जातात आणि आठवड्याचा बाजार भरून आणतात. बाजार म्हटलं कि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वचजण खूप उत्साहात असतात. त्यादिवशी सर्वजण मिळून बाजारात खरेदीसाठी जातात. लहान मुले तर हट्ट करून मोठ्यांसोबत हा बाजार पाहण्यासाठी जातात. त्याचप्रमाणे मी सुद्धा माझ्या आई आजोबांसोबत दर मंगळवारी बाजारात जाते. आमच्या गावचा बाजार हा दर मंगळवारी भरतो.

बाजारातील भाजीची रांग पाहून ही घ्यावी की ती घ्यावी असे होऊन जाते. शिवाय ताजी व स्वस्त असल्याने भाजी घेण्यासाठी गिऱ्हाईकांची झुंबड उडते. बाजारात प्रत्येक मालाची स्वतंत्र रांग असते. एका ठिकाणी पालेभाजी, धान्य, फळे तर दुसरीकडे कपडे, मासेवाले यांची गर्दी पाहायला मिळते. शोभेच्या वस्तू तसेच खाद्यपदार्थ विकणारे ही असतात. बाजारात शोभेच्या वस्तूही विक्रीसाठी असतात. गिऱ्हाईक आणि विक्रेते यांच्या मनोरंजनासाठी आपले डबडे वाजवत माकडवाला येतो आणि तो ही पैसे कमवून परततो.

डोंबाऱ्याचा खेळ आपल्या तारेवरील कसरतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. मधेच आईसक्रीमवाला घंटा वाजवत आपली गाडी फिरवत असतो. उन्हात फिरणाऱ्या लोकांना आईस्क्रीम खाऊन तात्पुरता थंडावा मिळतो. बाजारात गर्दीच गर्दी यादिवशी पाहायला मिळते. त्यामध्ये बाजारात खरेदी करण्यापेक्षा वस्तूंची किंमत विचारणारे आणि उगीचच फिरणारे जास्त गर्दी करतात.

बाजाराच्या दिवशी संध्याकाळी सर्वचजण विशेषकरून लहान मुले खूप खूश असतात. विक्रेते खिशातून पैसे खुळखुळवत घरी जातात आणि आपल्या चिमुकल्यांना खाऊ, खेळणी, चमचमीत पदार्थ, भरपूर भाजीपाला घेऊन जातात. तर गिऱ्हाईक भाज्या, धान्य, फळफळावळ आणि आपल्या चिमुकल्यांना नवीन कपडे, खाऊ, आणि खेळणी घेऊन जातात. अशाप्रकारे हा मंगळवारचा आठवडी बाजार सर्वांनाच आनंद देऊन जातो आणि तो कधी येतो असे सर्वांनाच वाटते.

Explanation:

plz मला फाॅलो कर.

Similar questions