तुमच्या परिसरातील कचऱ्याचे व्यवस्थापन कसे होते?
Answers
उद्योगधंद्यातून तयार होणारी मळी किंवा मिश्रण यात विषारी धातू, तेल, घातक रसायने असतात. यातील धातूंचा कचरा लिलाव करून कंत्राट देऊन विकला जातो. या कचऱ्याचे वर्गीकरण करून तो नष्ट करण्याची सक्ती उद्योजकांवर हवी.
वैद्यकीय कचराः हा कचरा नष्ट करण्यासाठी तो पिवळ्या रंगाच्या पिशवीत घालून त्याची शास्त्रीय विल्हेवाट लावण्यात यावी. निर्जुंतीकरण करून हा कचरा नष्ट करायला हवा. मोठ्या ज्वलनभट्ट्या तसेच मायक्रोव्हेवमध्ये हा कचरा नष्ट करता येतो.
बांधकामांचा कचराः विटा, धातू, लोखंडी सळ्या, खिडक्या, दरवाजे, पत्रे, लाकूड यांची विभागणी करून विल्हेवाट लावा, बांधकामांच्या कचऱ्यापासून विटा तयार करण्याचे तंत्र वापरा, सिमेंट-विटा एकत्र करून त्याचा चुरा करून उपयोग भराव घालून प्लॅटफॅार्म किंवा विभाजक बनवण्यासाठी वापरता येतो.
सॅनेटरी कचराः सॅनेटरी कचऱ्यात प्लास्टिकचे तंतू किंवा लाकूड लगदा वापरलेला असतो. पॉलिप्रॉपलीन आणि पॅालिइथिलीनच्या दोन स्तरांमध्ये लाकडाचा लगदा घातला जातो. हा कचरा कागदामध्ये वेगळा बांधून टाका.
आमच्या क्षेत्रातील कचरा व्यवस्थापनः
- कचरा व्यवस्थापनात कचरा व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व क्रिया समाविष्ट असतात. या क्रियाकलापांमध्ये संग्रहण, वाहतूक, वर्गीकरण, पुनर्वापर, उपचार, पुनर्वापर, संग्रहण आणि कचरा देखरेख समाविष्ट आहे (परंतु मर्यादित नाही). कचरा व्यवस्थापनात अशा इतर क्रियाकलापांचा देखील समावेश आहे ज्यात कचरा थेट हाताळला जात नाही, जसे की कचरा जनरेटरचे शिक्षण, बजेट, वित्तपुरवठा आणि नियमांचे पालन सुनिश्चित करणे.
- आमच्या शहरातील कचरा चांगला आहे. रस्त्यांवरील कचरा व कचरा विल्हेवाट लावण्यासाठी सरकारचे योग्य व्यवस्थापन आहे. तथापि, कचरा काढून टाकण्याची पूर्ण गरज अद्याप आहे.