Math, asked by nikitabagul06, 2 months ago

तुमच्या परिसरातील कष्टकरी स्त्रियांचे कुटुंबीय या कुटुंबाचा उदरनिर्वाहातील योगदान स्पष्ट करा.​

Answers

Answered by jhasejal292
4

Answer:

कागद- काच पत्रा वेचणाऱ्या महिलांसारख्या अगदी कमी मोबदल्याची लहानसहान कामं करणाऱ्या महिला एकूण अर्थव्यवस्थेत कुणाच्या खिजगणतीतही नसतात. पण अशाच महिलांना बरोबर घेऊन उभं राहिलेलं...महिलांसारख्या अगदी कमी मोबदल्याची लहानसहान कामं करणाऱ्या महिला एकूण अर्थव्यवस्थेत कुणाच्या खिजगणतीतही नसतात. पण अशाच महिलांना बरोबर घेऊन उभं राहिलेलं, व्यवस्थेला हलवू शकलेलं मोठं काम म्हणजे ‘सेवा’. म्हणजेच सेल्फ एम्प्लॉइड विमेन्स असोसिएशन. दुधाच्या क्षेत्रात जसं आणंद तसंसामाजिक क्षेत्रात ‘सेवा’चं योगदान आहे. आपल्या समाजात जातीच्या उतरंडीमध्ये तळाच्या जाती अगदीच दुर्बल, वंचित राहिल्या. अशा जातीतल्या स्त्रिया त्याहूनही पिचलेल्या. या स्तरातल्या कष्टकरी, गरीब, असंघटित स्त्रियांना त्यांच्या क्षमतांची, त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन ‘सेवा’ने त्यांच्यात आत्मसन्मान निर्माण केला. या स्त्रिया कोण होत्या तर दिवसभर कष्ट करून कागद-काच-पत्रा गोळा करणाऱ्या, चिंध्यांपासून रजयांच्या खोळी शिवणाऱ्या, भरतकाम करणाऱ्या, जंगलात जाऊन डिंक गोळा करणाऱ्या, मिठागरांमध्ये मीठ बनवणाऱ्या स्त्रिया. दिवसभर राब-राबून त्यांना जेमतेम दहा रुपयेही मिळत नसत. त्यांच्या कष्टांवर वरचे व्यापारी गब्बर होत. कारण या स्त्रियांना लिहिता-वाचता येत नसे, त्यांना वेगवेगळे सरकारी परवाने मिळवणं जमत नसे आणि मुख्य म्हणजे त्या पूर्णपणे असंघटित असत. ‘सेवा’ने जगाला त्यांच्या कष्टांची दखल घ्यायला लावली. त्या कष्टांचा या स्त्रियांना योग्य दर मिळावा यासाठी वेळोवेळी त्यांना संघर्ष करायला लावला. या प्रक्रियेत वेळोवेळी आलेल्या मोठय़ा अडचणींतही ‘सेवा’ त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. या सगळ्या प्रक्रियेत कष्टांशिवाय दुसरं काहीही माहीत नसलेल्या या स्त्रियांचं आयुष्य कसं बदललं, याचा आलेखच हे पुस्तक मांडतं. तेही वेगवेगळे व्यवसाय त्यात काम करणाऱ्या स्त्रिया, त्यांच्यापुढचे प्रश्न, ‘सेवा’शी संपर्क आल्यानंतर प्रश्नांकडे बघण्याचा त्यांचा बदललेला दृष्टिकोन आणि या सगळ्या प्रक्रियेत झालेलं त्यांचं सक्षमीकरण हे मुळातून वाचण्यासारखं आहे.

Advertisement

यातलं चिंध्या गोळा करणाऱ्या स्त्रियांचं उदाहरण ‘सेवा’च्या कामांचा आवाका समजायला पुरेसं आहे. अहमदाबादमध्ये मोठय़ा प्रमाणात असलेल्या कापड गिरण्यांमधून टाकून दिल्या गेलेल्या कापडाच्या चिंध्यांवर उपजीविका करणारा एक मोठा समूह तिथे होता. मोठे व्यापारी कापडाचे उरलेले तुकडे, चिंध्या विकत घेत आणि दलालांमार्फत त्या चिंध्या झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब स्त्रियांपर्यंत पोहोचवत. या स्त्रिया त्या कापडांपासून, चिंध्यांपासून रजयांची खोळं शिवत. गिरण्यांमधून मिळणाऱ्या तेलकट चिंध्या धुवायच्या, वाळवायच्या, आपलंच मशीन, आपलाच दोरा, आपलीच जागा वापरून त्यापासून खोळ शिवायची. या सगळ्याच्या बदल्यात त्या स्त्रियांना अगदी नगण्य पैसे मिळत. काहीही न करता केवळ काम आणून देण्याच्या बदल्यात व्यापारी, दलाल भरपूर पैसे कमवत. आपली यात फसवणूक होते हे या स्त्रियांना समजत असे, पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना माहीत नव्हता आणि हे काम गेलं तर इतर काही काम मिळवण्याचं कौशल्यही त्यांच्याकडे नव्हतं. ‘सेवा’ने त्यांच्यात काम करायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या समस्या समजून घेतल्या. सर्वेक्षण केलं. त्यांची नेमकी कशी फसवणूक होते ते त्यांच्याच लक्षात आणून दिलं. या स्त्रियांना आत्मविश्वास दिला. आवाज उठवायला शिकवलं. चिंध्या व्यापाऱ्यांशी बोलणी करायला लावली. कामगारमंत्र्यांना या प्रश्नाची दखल घ्यायला लावली आणि या स्त्रियांना योग्य मोबदला मिळवून दिला.

पुस्तकात येणाऱ्या अनेक जणींच्या उदाहरणांतून ग्रामीण, असंघटित स्त्रियांना योग्य दिशा मिळाली तर त्या काय करू शकतात, त्यांच्यामधली ऊर्जा जागवणं हे किती महत्त्वाचं काम ‘सेवा’ ने केलं आहे याचं प्रत्यंतर येतं. ‘सेवा’ची ही सगळी यशोगाथा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना माहीत असते, पण त्यापलीकडे इतर क्षेत्रात ती माहीत असेलच असं नाही. ती माहीत मात्र करून घ्यायला हवी, कारण संघर्षांत्मक आणि रचनात्मक काम अशा पद्धतीने सातत्याने करत राहणं आणि त्यात यशस्वी होणं ही एक खरोखरच अवघड गोष्ट आहे. गेल्या काही वर्षांत अशा कामांसाठी बचत गटाचा बांगलादेशी पॅटर्न आपल्याकडेही विकसित होत गेला आहे. पण असं काही नव्हतं तेव्हा ‘सेवा’ने आपल्या कामाला सुरूवात केली आणि ‘नाही रे’ वर्गातल्या स्त्रियांच्या बरोबरीने वाटचाल करत झळाळतं यश मिळवलं आहे. खरं तर यापेक्षाही असं म्हणायला पाहिजे की या स्त्रिया ‘सेवा’बरोबर आल्या. त्यांनी वेळोवेळी संघर्ष केले आणि त्यांच्यामुळे ‘सेवा’ घडत गेली. या स्त्रिया म्हणजेच ‘सेवा’ आणि सेवा म्हणजेच या स्त्रिया असं हे समीकरण आहे. या सगळ्या कामासाठी ‘सेवा’ला आणि इला भट्ट यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या कामाची दखल घेतली गेली. ‘वुइ आर पुअर बट सो मेनी’ हे इला भट्ट यांनी लिहिलेलं पुस्तक आलं २००६ मध्ये आणि अलीकडे त्याचा मराठी अनुवाद आला आहे. आज सामाजिक क्षेत्रातल्या सगळ्या कामांचं एनजीओकरण झालं आहे. त्याआधीच्या काळातली संघर्षांत्मक आणि रचनात्मक सामाजिक कामं कशी चालत, याचं हे पुस्तक म्हणजे उत्कृष्ट डॉक्युमेंटेशन आहे. स्त्रियांच्या सबलीकरणाचा हा अलौकिक प्रयोग वाचायलाच हवा असा आहे. सुनीती काणे यांनी या पुस्तकाचा अनुवाद उत्तम केला आहे.

Similar questions