History, asked by amitabh5154, 10 months ago

तुमच्या सर्वात जवळच्या मैत्रिणीचे नाव काय ? मैत्रीच नातं तुम्ही कस निभावता ते लिहा ?

Answers

Answered by swatianurish
26

Answer:

Explanation:

"मैत्री" म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं एखादं छानसं जाळीदार पान आहे.जसंजसं त्याचं आयुष्य वाढत जातं तसंतसं त्याच्या सुंदरतेला तेज चढत जातो.आपल्या life index मधला सगळ्यात वरचा कप्पा.

"मैत्री" या शब्दातच सगळं काही आलं. किती सहजतेने करतो ना आपण मैत्री ..पण तशीच टिकवून ठेवणे सगळ्यांना च जमते अस नाही.मैत्री मध्ये गैरसमज हा सगळ्यात महत्वाचा दुवा आहे. केव्हा,कुठे, कधी कसा मैत्री त गैरसमज निर्माण होईल काहीच सांगता येत नाही.पण जर एकमेकांना वर विश्वास असला तर मग गैरसमजला मैत्रित स्थान नाही. मैत्री ही बंधन कारक नको. "When i m free you should also free". असे जर झाले तर मैत्रीत दुरावा यायला काहीच वेळ लागत नाही.

"मैत्रीत "विश्वास, त्याग आणि एकमेकांना त्याची sapce देणं ,आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनात जे असेल ते मोकळे पणे एकमेकांना सांगणं फार गरजेचे आहे.ह्या गोष्टी मुळे मैत्री ही life long टिकून राहते. पण हता गोष्टी दोघांकडून सारख्या प्रमाणात असाव्या. कारण, भावनेशी direct connection असलेले हेच एक नात असत "मैत्री च".

इथेच तर आपण आपल्या मनातलं अगदी कशाचाही विचार न करता बोलत असतो. कारण आपल्याला माहित असत कि समोरची व्यक्ती आपल्याला कधी judge करणार नाही.

"मैत्रि" म्हणजे एक मोहक वाऱ्याची झुळूक, जी आपल्याला हवे तिकडे सोबत घेऊन जात आपल्या नकळत.कॉलेजचा कट्ट्यावर काढलेले ते दिवस आता पुन्हा येतील की नाही माहीत नाही, पण नकळत झालेली रुसवे-फुगवे आज आठवली तरी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी बरे वाटते आणि गालावर छान खळी खुलते, तीच हि मैत्री.

लहान मुलांसारखे केलेला हट्टीपणा आजही खूप काही सांगून जातो. अगदी जान, सोना आणि ताई पर्यंतचा हा प्रवास खूप सुंदर असतो. काही क्षण अजूनही अनुभवायला मिळतात, तर काही भूतकाळात विरघळून गेल्या.वेळेचे बंधन नसलेले हे जग कधीच सोडावेसे वाटत नाही, पण काळाबरोबर चालता चालता कधी एकदा हात नकळत सुटतो हे काही सांगता येत नाही. "येणारे येतात अन जाणारे जातातही",पण मैत्री हि अशी सहज विसरता येत नाही. म्हणून तर आजही हे नाते रक्ताचा नात्या पेक्षा जवळचे मानले जाते.

"मैत्री" ही सगळ्यांशीच होत नाही, करायची ठरवली तरी ती करता येत नाही, कारण त्या सुंदर मैत्रिला वयाचं बंधन नाही. आपल्या मैत्रिचा ठेवा हा सर्वांनी असाच जपुन ठेऊ. मैत्रीच्या विश्वात आपण इतके रमून गेलो असतो की दुरावण्याच्या कल्पनेने अंगावर अगदी काटा उभा राहतो. त्या आठवणी इतक्या गोड असतात कि त्यांना मन कधी दूर जाऊच देत नाही.

"मैत्री "चा आठवणींमध्ये आपण असे काही रमून जातो काहीच कळत नाही. "मैत्री " ला कधी friendship band ची गरज नाही ,कारण ती बंधन नसून अतूट नात्याची शिदोरी असते. शेवटी मैत्रीची व्याख्या ही कोणालाच व्यवस्थित मांडता येत नाही, हे खरे.

Answered by datalgajanan
1

Answer:

hii guugusyhkggdk. bfyfg

Similar questions