Hindi, asked by vrenu5126, 1 day ago

तुमच्या शाळेच्या समोर ठेलेवाले (फेरीवाले) बसतात त्या बाबत तक्रार करणारे पत्र लिहा. In Marathi.​

Answers

Answered by vaishnavipawar951
0

नाव

पत्ता

दिनाक

शाळा

मा . मुख्यद्यपिका

नमस्कार मडम मी इयत्ता दहवी ची वर्ग प्रतिनिधी आहे व आज मी तुम्हाला एक तक्रार सांगणार आहे आपल्या शाळेच्या समोर ठेवलेलं पेरीवले बसतात त्या बाबत मी आज आज तकर करत आहे

Explanation:

hope may help you

Answered by Sauron
9

Answer:

★ औपचारिक पत्र :

दिनांक : 16 ऑक्टोबर, 2021

प्रति,

मा. अतिरिक्त आयुक्त,

अतिक्रमण निर्मूलन विभाग,

महानगर पालिका भवन,

शिवाजीनगर,

पुणे - 411039

विषय : शाळेच्या समोर ठेलेवाले (फेरीवाले) बसतात त्या बाबत तक्रार करणेबाबत.

महोदय,

मी गौरी देशमुख (शाळेचे नाव) वर्ग (इयत्ता) येथे शिक्षण घेत असून, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मा. मुख्याध्यापकांची परवानगी घेऊन आपणास पत्र लिहीत आहे. महोदय, आमच्या शाळे समोर फेरीवाल्यांनी दुकाने मोठ्या प्रमाणात लावली आहेत. या फेरीवाल्यांनी शाळेसमोरील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले आहे. त्याचा त्रास मुख्यतः शाळेतील विद्यार्थ्यांना होत आहे. शाळेचे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती भागात आहे आणि त्यातच फेरीवाल्यांचे हे अशाप्रकारे केलेले अतिक्रमण त्यामुळे वाहतुकीची कोंडी ही समस्या तर नित्याची झालेली आहे. शाळेची वाहने कधीकधी तर दूरवर थांबवून मग विद्यार्थी शाळेत पायी चालत येतात, विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो तसेच फूटपाथवर फेरी वाले असल्यामुळे पादचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. खाद्यपदार्थांचे दुकान लावलेली फेरीवाले कचरा तिथेच अस्ताव्यस्त फेकून देताना दिसून येतात परिणामतः आजूबाजूच्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरत आहे.

तरी आपण या गंभीर समस्येकडे जातीने लक्ष देऊन यासंदर्भात कठोर ती कारवाई करावी अशी नम्र विनंती

आपली विश्वासू

गौरी देशमुख

विद्यार्थी प्रतिनिधी

(शाळेचे नाव)

(शाळेचा पत्ता)

Similar questions