तुमच्या शाळेच्या वतीने आयोजित केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा
Answers
Answer:
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.
शाळा महाविद्यालयांमध्ये ,वकृत्वस्पर्धा, स्नेहसंमेलन असे अनेक कार्यक्रम संपन्न होत असतात.तसेच शासकीय ,सामाजिक ,आर्थिक संस्थांचेही कार्यक्रम होत असतात .या कार्यक्रमानंतर त्यांचे अहवाल लिहिले जातात. असे अहवाल भविष्यात विविध प्रकारे उपयुक्त ठरतात. अहवालामुळे वाचकाला समारंभाचा तपशील माहिती होतो.
स्वरूप :एखाद्या कार्यालयात ,संस्थेत झालेल्या कार्यक्रमांची ,समारंभांची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणे म्हणजे ‘अहवाल लेखन ’ होय. हि नोंद करताना त्यात कार्यक्रमाचा हेतू ,तारीख ,वेळ,सहभागी व्यक्ती ,प्रतिसाद ,समारोप अश्या विविध मुद्यांचा समावेश असतो. कार्यक्रम ,समारंभ सुरु झाल्यापासून ते थेट तो समारंभ किवा कार्यक्रम संपेपर्यंत क्रमाक्रमाने कसा पूर्ण होत गेला याची आवश्यक तेवढ्या तपशिलांसह लेखी नोंदी अहवालात केली जाते .
अहवालाची प्रमुख चार अंगे :
प्रास्ताविक(अहवालाचा प्रारंभ )
अहवालाचा मध्य( विस्तार )
अहवालाचा शेवट ( समारोप )
अहवालाची भाषा
अहवाल लेखनाची वैशिष्टे :
वास्तुनिष्टत्ता आणि सुस्पष्टता :
अहवालाच्या स्वरूपानुसार त्यामध्ये तारीख, वार, वेळ, ठिकाण ,सहभाग घेणाऱ्यांची नावे, पदे, घटना ,हेतू ,निष्कर्ष इत्यादी अनेक महत्वाच्या वस्तुनिष्ठ बाबींच्या नोंदी आवर्जून आणि अचूकतेने केलेल्या असतात .
विश्वसनियता :
अहवालातील विश्वासनीय माहिती आणि तथ्यानच्या नोंदीमुळे अहवालाला विश्वसनीयता प्राप्त होते. या विश्वसानीतेमुळे अनेक गुंतागुंतीच्या समस्यांमध्ये असे अहवाल पुरावा म्हणूनही वापरले जाते .
सोपेपणा :
शक्यतोवर सर्वसामान्य व्यक्तीलाही अहवालाचा आशय समजावा अशी अपेक्षा असते.हे गृहीत धरून जेव्हा अहवाल लिहिला जातो तेव्हा साहजिकच त्याची भाषा हि सोपी होते.
शब्दमर्यादा :
अहवालाच्या विषयावर / स्वरूपावर अहवालाची शब्दमर्यादा अवलंबून असते. सांस्कृतिक, क्रिडाविषयक ,इत्यादी प्रकारचे स्थानिक पातळीवरील अहवाल आटोपशीर असतात .
नि:पक्षपातीपणा :
अहवालाचा विषय कोणताही असो ,प्रकार कुठलाही असो सर्वच प्रकारच्या अहवालांचे एक सामायिक वैशिष्ट म्हणजे त्या अहवालाचा नि:पक्षपातीपणा.