तुमच्या शाळेत ऑनलाइन साजरा झालेल्या स्वातंत्र्य दानाची बातमी करुन लिहा
please help me i have lot do
Answers
उत्तर :
★ बातमी लेखन :
फर्ग्युसन विद्यालयामध्ये ऑनलाइन पद्धतीने स्वतंत्रता दिवस साजरा
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. 16 फर्ग्युसन विद्यालयामध्ये स्वातंत्र्यदिन कोरोना च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. मागच्या वर्षापासून कोरोना चा प्रादुर्भाव वाढला कारणामुळे शाळा महाविद्यालय बंद असून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. त्यातच स्वातंत्र्यदिन पण ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला.
या विशेष कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन हजर राहणे सक्तीचे केले गेले होते. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी नगराध्यक्ष श्री पाटील व शिक्षण मंत्री श्री जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन राष्ट्रगीत गायन केले.
एक खास दिनानिमित्त ऑनलाईन चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली होती. विजेत्यांची नावे मुख्याध्यापक श्री देशमुख यांनी घोषित केली. स्वातंत्र्य दिन भलेही ऑनलाईन साजरा केला असो पण विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.