तुमच्या शाळेत संपन्न झालेल्या श्रमदान शिविराची बातमी तयार कर
Answers
Answered by
0
श्रमदान शिबीर
- वार्ताहर शशांक
५ मार्च २०१९, शिवडाव, कोल्हापूर : दिनांक ५ मार्च रोजी कोल्हापूर मधील शिवडाव, सोमवार पेठ येथे श्रमदान शिबीर आयोजित केले होते. तालुक्यातील दुष्काळी पार्श्वभूमीवर हे शिबीर पाणी फाउंडेशन या संस्थेने आयोजित केले होते. मा. आमदार श्री. अमोल कोल्हे यांनी सकाळी ८ वाजता स्वतः जातीने कुदळ हाती घेऊन या श्रमदान शिबिराचे उदघाटन केले. प्रचंड जनसमुदाय आणि पाणी फाउंडेशन चे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हे शिबीर यशस्वीपणे पार पडले.
शिबिरातील प्रत्येकाने श्रमदान करून आपली समाजाप्रती असलेली बांधिलकी जपली. गावागावातून शेततळी तयार करण्यासाठी योग्य नियोजन, सखोल ज्ञान आणि मानवी संख्याबळ यांच्या अजोड मिलापामुळे हे शिबीर यशस्वी झाले.
Similar questions