तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही कोणत्या पर्यावरणपूरक
पद्धती अंगिकारू शकता ते लिहा.
Answers
Answered by
12
Answer:
स्वच्छ पर्यावरण असणे मानवी आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. मानवाच्या हव्यासापोटी व अत्याधुनिक साधनांच्या जोरावर मनुष्यप्राणी पर्यावरणाचा ह्रास करत आहे. पर्यावरण जर वाचवले नाही तर कालांतराने मनुष्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागेल.
आपल्याला ज्या काही गोष्टी शक्य होतील तेवढ्या गोष्टी दैनंदिन जीवनात पर्यावरण वाचवण्यासाठी केल्या पाहिजेत.
आपण आपल्या दैनंदिन जीवनात खालील पर्यावरण पूरक गोष्टी अंगीकारु शकतो-
- प्रत्येकाने कमीत कमी एक झाड तरी लावले पाहिजे व ते वाढवले पाहिजे.
- वृक्षतोडीवर बंदी आणली पाहिजे.
- प्लास्टिकचा वापर कमीत कमी केला पाहिजे.
- अनावश्यक कागदांचा वापर टाळला पाहिजे.
- औद्योगिकरणामुळे रसायनयुक्त पाणी नदी नाल्यांमध्ये जे सोडतो ते पाणी प्रक्रिया करूनच सोडले पाहिजे.
- जेवढे शक्य होईल तेवढे वाहनांचा वापर पाळला पाहिजे.
- अनेक गोष्टींचा पुनर्वापर केला पाहिजे.
- मुक्या प्राणी व पक्ष्यांची काळजी घेतली पाहिजे.
Similar questions
Social Sciences,
4 months ago
Art,
8 months ago
CBSE BOARD XII,
8 months ago
English,
1 year ago
Hindi,
1 year ago