India Languages, asked by swarupbodke, 1 month ago

तुमच्या धाकट्या बहिणीने एक तरी छंद जोपासावा , तिला छंदांचे महत्त्व कळावे - ह्याविषयी मार्गदर्शन करणारे पत्र लिहा.

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

Explanation:

छंद म्हणजे रिकामा वेळ घालवण्यासाठी, मनोरंजनासाठी, त्याचप्रमाणे हौस म्हणून माणूस जे काही करतो त्याला छंद म्हणतात. छंद अनेक प्रकारचे असतात, प्रत्येक छंदातून आनंद नक्की मिळतो. जीवनात तोच तो पणा असेल मनाला मळभ येते. हे मळभ दूर करण्यासाठी, विरंगुळा म्हणून काही छंद जोपासणे आवश्यक असते.

छंद माणसाला स्वत:चा शोध घ्यायला शिकवतात, छंद माणसाला जगायला शिकवतात, छंद जीवनाचा, निसर्गाचा शोध घेणं शिकवतात. मनुष्य हा निर्मितीशील प्राणी आहे आणि ही निर्मितीची इच्छा हाच आपल्या छंदाचा उगम असतो. ही सर्जनशीलता प्रत्येक माणसांत असते.

तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे तुमची ऊर्मी दाबून टाकत असता, पण आपला एखादा छंद जोपासून ही ऊर्मी फुलू देणं हे आपल्या हातात असतं. प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता छंद असतो. कुणी जुन्या नाण्यांचा संग्रह करतो, कुणी टपाल टिकीटं जमवतं, कुणाला गाणी ऐकण्याचा छंद असतो, तर कुणाला फिरण्याचा छंद असतो.

पेन्टिंग, ट्रेकिंग, भटकंती, गायन, वाचन, पाककला, प्राणी पाळण्याचा, लिहिण्याचा, माणसं जोडण्याचा असे कितीतरी प्रकारचे छंद असू शकतात. कुणी या सर्व गोष्टी छंद म्हणून जोपासतात, तर कुणी या छंदातच आपलं करिअर करतात.

Answered by sahildudhal
1

Answer:

thank you so much yrr

खूप मदत केली तू

Similar questions