१. तुमच्या धाकट्या भावाला / बहिणीस व्यायामाचे महत्त्व सांगणारे पत्र लिहा.
please tell the ans I follow you
Answers
Answer:
दिनांक:२१ जानेवारी, २०२२
प्रिय राहुल,
खूप खूप आशीर्वाद.
मला माहित आहे दहावीचे वर्ष असल्याने तु अभ्यासात खूप व्यस्त आहे. अभ्यासात व्यस्त असणे चांगलेच आहे, पण त्याबरोबरच स्वतःच्या शरीराची काळजी घेणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण असे म्हणतात की आरोग्य चांगले असेल तर तुम्ही जगातील कुठलीही गोष्ट मिळवू शकतात. मला आई बाबांनी सांगितले की अभ्यासामुळे व इतर अनेक गोष्टींमुळे तू तुझ्या आरोग्याकडे फारसे लक्ष देत नाही.
मला असे वाटते की तू नियमित व्यायाम केला पाहिजे. व्यायाम हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे. व्यायाम केल्याने आपले शरीर सुदृढ होण्यास खूप मदत होते. ज्याप्रमाणे शरीराला सकस आहाराची गरज असते त्याच प्रमाणे शरीराला नियमित व्यायामाची गरज असते. व्यायामामुळे माणसाला नेहमी ताजेतवाने वाटते. शरीरात वाढणाऱ्या अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी व्यायामाची खूप मदत होते. म्हणून मला असे वाटते की तू देखील नियमित व्यायाम केला पाहिजे. आरोग्य हीच माणसाची सर्वोत्तम संपत्ती असते.
मी लवकरच गावाला येणार आहे. मग आपण कुठेतरी फिरायला जाऊया. स्वतःची व आई बाबांची काळजी घे.
तुझा दादा,
समीर