CBSE BOARD X, asked by pranjalyadav231, 20 hours ago

तुमच्या विद्यालयात युवक दिन कसा साजरा केला याची बातमी तयार करा

Answers

Answered by piyushgokhe143
0

Answer:

स्वामी विवेकानंद जयंती, म्हणजेच युवा दिन गुरुवारी शाळा, महाविद्यालयांसह स्वयंसेवी संस्थांनी विविध उपक्रम राबवत उत्साहात साजरा केला. यानिमित्त विवेकानंदाच्या विचारावर आधारित व्याख्यान, स्पर्धा घेण्यात आल्या.

न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कॉलेज प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या वेळी कॉलेजमधील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सचिव संतोष कानडे यांनी युवा दिनाचे औचित्य साधून अवयव दानाचा संकल्प केला. त्याबाबतचे निवेदन कानडे यांनी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना दिले. शहर भाजपाच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. युवक काँग्रेसच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून रिमांड होम येथील अनाथ मुलांना शंभर किलो धान्य देण्यात आले.

Similar questions