तैनाजी फौजेची पध्दत का सुरु करण्यात आली?
Answers
Answered by
0
Answer:
हिंदुस्थानात सार्वभौम सत्ता स्थापन करण्यासाठी फ्रेंच आणि इंग्रज यांनी अवलंबिलेली एक उपाययोजना म्हणजेच तैनाजी फौज हि पध्दत होय.
Explanation:
इ.स. १७९८ ब्रिटिश भारतातील गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्ली याने भारतातील संस्थानांवर ब्रिटिशांचा अधिकार वाढविण्यासाठी तैनाती फौज ही सुरु केली.
तैनाती फौजेच्या अटी
- आपापसांतील तंट्याचा निकाल इंग्रज करतील तो संस्थानिकांनी मान्य करावा.
- संस्थानिकांनी फौजेच्या खर्चापुरता मुलूख तोडून द्यावा.
- इंग्रजांच्या परवानगीशिवाय इतर युरोपीयांस आपल्या पदरी नोकरीस ठेवू नये व परकीय सत्तेशी कोणताही करार करू नये.
- तैनाती फौजेचे अधिकारी इंग्रजच असावेत.
Similar questions