Science, asked by manikmitmm7892, 1 year ago

ताणतणाव कमी करणारे छंदचे तीन उदाहरणे द्या.

Answers

Answered by Monieeshan
1

वर्षांचा सतीश एका मल्टिनेशनल बँकेमध्ये एक्झिक्युटिव्ह पदावर काम करत आहे. दोन वर्षांपूर्वी त्याला या पदावर बढती मिळाल्याचा कोण आनंद व अभिमान वाटत होता! पण गेल्या सहा महिन्यांपासून काहीतरी बिनसले आहे. त्याचा दिवसच मुळात ७.३० वाजता सुरू होतो ते त्याच्या बॉसने काल आठवण करून दिलेल्या डेडलाईन्सने! उठल्यापासूनच त्याला हताश, निरुत्साही वाटू लागले आहे. कसेबसे स्वतःचे आवरून, घाईगडबडीत कसातरी नाश्ता पोटात ढकलून तो नऊ वाजता धापा टाकत बॅंकेत पोचतो खरा, पण त्याला पुढचा सगळा दिवस अक्षरशः अंगावर आल्यासारखा वाटतो. त्याला पाहिल्यासारखे ना क्लायंटशी संवाद साधावा वाटतोय ना ऑफिसमधील सहकाऱ्यांशी सल्लामसलत करावीशी वाटते आहे . एखाद्या चुकलेल्या टार्गेटबद्दल मीटिंगमध्ये खुलासा करावा लागलाच तर त्याला कसे तोंड द्यावयाचे या चिंतेने त्याचे डोके चढू लागते, छाती धडधडू लागते, कामात लक्ष लागत नाही. लंच भरभर उरकून सतीश परत आपल्या केबिनमध्ये येऊन बसतो खरा, पण तो स्वतःवरच इतका कातावलेला असतो की पुढचे काम करायचा ओढूनताणून आणलेला उत्साहही निघून गेलेला असतो. वैतागून तो कॅन्टीनमध्ये येतो आणि अस्वस्थतेने दोन सिगारेट्स भसाभसा ओढतो. घरी येतानाही तो त्याच मूडमध्ये असतो. त्याची पत्नी अगत्याने त्याला ‘हेल्दी स्नॅक्स’ व चहा आणून देते. छोटी मुलगी अवतीभोवती किलबिलत असते. पण त्याला क्षणी त्याला काही वेळ एकटे राहण्याव्यतिरिक्त काही नको असते. याबद्दलपण त्याला दुःखीकष्टी व अपराधी वाटत असते. तो मनाशी म्हणतो ‘च्यायला काय आपली जिंदगी… आपल्याबरोबरचे बाकीचे कसे बिनधास्त असतात.आपला एवढा चांगला जॉब आहे, फॅमिली छान आहे; पण आपण मात्र सदानकदा त्रस्त..। जणू काही वाघ पाठीमागे लागलाय आपल्या… ऐन पस्तिशीत आपल्यासोबत आहे कोण तर नुकतेच निदान झालेले ब्लडप्रेशर… जोडीला अॅसिडिटी व पाठदुखी आहेतच!

Answered by halamadrid
4

Explanation:

ताणतणाव कमी करण्यासाठी पुढीलपैकी छंद जोपासले जाऊ शकतात:

१.वाचन:

वाचन हा छंद तर सगळ्यांनीच जोपासला पाहिजे.वाचनाच्या छंदामुळे आपल्याला विविध गोष्टींचा ज्ञान तर मिळतोच,पण त्याचबरोबर वाचन करताना आपले मन वेगळ्याच दुनियेत रमून जाते.आपले मन शांत होते,ताणतणाव कमी होते,आपले विचार सकारात्मक बनतात व आपला आत्मविश्वास वाढतो.

२.नृत्य करणे:

हा छंद जोपासाला पैसा लागत नाही,फक्त एखाद्या गण्याची गरज असते. गाणी लावा आणि बिंधास्त,बेफिकीर होऊन नाचा, यामुळे नक्कीच आपले ताणतणाव कमी होते.त्याचबरोबर आपल्याला आनंद ही खूप मिळतो.

३.एखादे खेळ खेळणे:

खेळ खेळल्यामुळे आपला शारीररिक व्यायाम तर होतोच,पण त्याचबरोबर आपला उत्साह वाढतो आणि ताणतणाव कमी होतो,तसेच मित्र-मैत्रिणींबरोबर खेळ खेलताना खूप मजादेखील येते.

Similar questions