) तुनही तुमच्या जवळच्या मित्र किंवा मैत्रिणीच्या भेटील आसूलेले आष्टात' हे सांगण्यासाठी सादा दृष्टान्त तो वापरा व
स्पष्ट करा
Answers
Question:
तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र किंवा मैत्रिणीच्या भेटीला असलेले आष्टा' हे सांगण्यासाठी सादा दृष्टान्त तो वापरा व स्पष्ट करा।
Answer:
मी आज जवळपास साठीत आहे त्यामुळे मैत्रिणी नाहीत. मी फक्त मुलांच्या शाळेत असल्यामुळे आमच्या शाळेत मुळीच मुलीच नव्हत्या. आमच्या काळात क्लासेसचे आजच्याइतके फॅड नव्हते त्यामुळे तो रस्ता सुद्धा बंद होता. आणि कॉलेजमध्येसुद्धा मुलंमुली फारशी मैत्री नसायची. [असलीच तर तो सामुदायिक चर्चेचा विषय असायचा.] मला माझ्या बोलण्यात उगाच कृत्रिम मार्दव, सभ्यता, नम्रता, शिष्टाचार वगैरे ओढूनताणून आणता येत नाही. शिवाय मला माझ्या शब्दात भडास काढणे आवडते त्यामुळे गृपमध्ये मुली नसाव्यात अशाच मताचा मी होतो. त्यातून माझा गोड मनमिळाऊ स्वभाव बघता माझी कधी मुलींशी मैत्री वगैरे झाली नाही - मी त्या फंदात पडलो नाही आणि मुलींनीसुद्धा कधी धाडस केले नाही.
मित्रांच्या बाबतीत बोलायचे तर हजार काचेचे तुकडे असल्यापेक्षा नेमके चार-पाच घट्ट मित्र असलेले चांगले असे मला वाटते.
मैत्रीतला सर्वात महत्वाचा गुण म्हणजे मैत्रीशी प्रामाणिक असणे.
मित्र पैशाने श्रीमंत असो वा गरीब - तो मित्राशी आणि मैत्रीशी प्रामाणिक हवा.