Hindi, asked by kalpeshbhamre72, 1 year ago

(१) टिपा लिहा.
(अ) बार्क,
(आ) डॉ. होमी भाभा.
please answer​

Answers

Answered by nayan10b
137

Answer:

(अ) बार्क

बार्क म्हणजे B.A.R.C. म्हणजेच 'भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर' चे लघुरूप आहे.बार्कला मराठीत 'भाभा अनु संशोधन केंद्र' असे म्हणतात. डॉ. होमी भाभा हे भारतातील थोर अनु शास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतामध्ये अनु संशोधनाचा पाया घातला. भारताच्या अनु संशोधनाचे होमी भाभा हे अध्वर्यू होते. म्हणून त्यांचे नाव अनु संशोधन केंद्राला दिले आहे. 'बार्क' ही संस्था प्रचंड मोठी व नावाजलेली आहे. ही संस्था अनुऊर्जा संबंधित संशोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य आजतागायत निष्ठेने करीत आहे

(आ) डॉ. होमी भाभा

डॉक्टर होमी भाभा हे भारतातील विश्वविख्यात अनु शास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतातील अनु संशोधनाचा पाया घातला म्हणून त्यांचे नाव अनु संशोधन केंद्राला दिले आहे. B.A.R.C. म्हणजे भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर! त्यांचे व्यक्तिमत्व तरुण नवीन शास्त्रज्ञ पिढीला स्फूर्तीदायक होते. लेखकांनी त्यांच्याबद्दल सांगितलेली एक आठवण आहे - लेखक लेखक जेव्हा ट्रेनिंग स्कूल ला शिकत असताना, तिथे होमिभाभा तीन-चार वेळा आले होते. मुलामुलींनी त्यांना विचारले की आम्हा सर्वांना पुरेल इतके काम आहे का? तेव्हा बाबा म्हणाले की तुम्ही चिंता करू नका. तुम्ही सर्वजण संशोधन करा. तुम्ही स्वतःचं काम निर्माण करा. काय काम करायचे ते तुम्ही स्वतः ठरवा. बॉसने सांगितले तेवढेच काम करायचे ही प्रवृत्ती चुकीची आहे. या उदाहरणातून होमी भाभा यांचा संशोधनाच्या बाबतीतला सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो.

Answered by kartik9147
35

Answer:

Hope you got the answer

Attachments:
Similar questions