(४) टिपा लिहा.
(अ) देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक (आ) जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक
Answers
Answer:
"नमस्कार,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""वीरांगना"" या पाठातील आहे. स्वाती संतोष महाडिक यांचे पती कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आले असता त्या खचून गेल्या नाहीत उलट स्वतःच सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अमाप कष्टही घेतले. त्यांच्या या वीरगाथेचा परिचय या पाठात करून दिला आहे.
★ टिपा लिहा.
(अ) देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक.
उत्तर- कर्नल संतोष महाडिक हे एक खरे देशभक्त होते. त्यांनी स्वतःला देशासाठी वाहून घेतले होते. भारतीय सैन्यदल आणि आपली वर्दी यांच्यावर निष्ठा ठेऊन ते कार्यरत होते. अचानक १७ नोव्हेंबर २०१५ रोजी काश्मीरमधील दहशतवाद्यांनी हल्ला केला. महाडिक यांनी प्राण पणाला लावून दहशतवाद्यांचा निःपात केला. आणि दुर्दैवाने कर्नल संतोष हे हुतात्मा झाले.
(आ) जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक.
उत्तर- लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची जिद्द त्यांच्या निर्धारातून दिसते. पतीचे अंत्यविधी झाल्यानंतर त्यांनी सैन्यात जाण्याचा निश्चय केला. आणि लेफ्टनंट म्हणून त्या सैन्यदलात दाखल झाल्या. कर्तबगारीने खांद्यावर अभिमानाचे दोन स्टार मिळवले. पतीचे स्वप्न नष्ट होऊ दिले नाही. हे सर्व त्यांच्या जिद्दी स्वभावामुळे घडू शकले.
धन्यवाद..."
Explanation: