टिपा लिहा आकाशवाणी। मराठी मध्ये।
Answers
Answer:
रेडिओ-कार्यक्रम प्रक्षेपित करणारी भारत सरकारची यंत्रणा. भारतात नभोवाणीचा विकास गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांतच झालेला आहे. १९२६ मध्ये ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी’ ह्या एका खाजगी कंपनीने भारत सरकारशी एक करार करून मुंबई व कलकत्ता येथे अनुक्रमे २३ जुलै व २६ ऑगस्ट १९२७ रोजी दोन रेडिओ-केंद्रे सुरू केली. या केंद्रांची कार्यक्रम ४८ किमी. च्या परिसरातच ऐकू येण्याची व्यवस्था होती. या सुमारास देशात १,००० रेडिओ-परवाने होते. १९२७ च्याही अगोदर भारतात नभोवाणीचा प्रसार खाजगी हौशी क्लबांद्वारा झालेला होता. १९२४ मध्ये मद्रास येथे पहिला रेडिओ-क्लब स्थापन झाला. हौशी रेडिओ-क्लब लाहोर, अलाहाबाद, पेशावर, व डेहराडून येथे चालविले जात होते. सरकारने भावी काळात स्थापिलेल्या रेडिओ-केंद्रांचे हे रेडिओ-क्लब अग्रदूत ठरले. म्हैसूर, बडोदा, त्रिवेंद्रम, हैदराबाद आणि औरंगाबाद ह्या पाच ठिकाणीही नभोवाणी-कार्य चालू होते. म्हैसूर संस्थानाने १९३५ मध्ये स्थापिलेल्या रेडिओ-केंद्रास ‘आकाशवाणी’ हे नाव दिले होते. हेच नाव पुढे भारत सरकारने देशातील सर्व रेडिओ-केंद्रांसाठी स्वीकारले.
Answer:
स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1924 मध्ये इंडियन बोर्ड कॉस्टिंग कंपनी( IBC) या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करण्यात येत खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने या कंपनीचे इंडियन स्टेट सर्विस असे नामकरण केले 8 जून 1936 रोजी या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ (ए आय आर )असे झाले.