२. टीपा लिहा.
(१) आदिवासी चळवळ
Answers
Answer:
आदिवासींनी त्यांच्या हक्कांसाठी व मागण्यांसाठी केलेली चळवळ म्हणजे 'आदिवासी चळवळ' होय.
Explanation:
१. पूर्वीपासूनच आदिवासींचा उदरनिर्वाह हा जंगलावर व जंगलसंपत्तीवर होत असे.
२. मात्र, ब्रिटिश राजवटीत आदिवासींना जंगलावर उदरनिर्वाह करण्यास बंदी घालण्यात आली.
३. या असहाय व अन्यायकारक बंदी विरोधात ब्रिटिशांविरुद्ध अनेक आदिवासींनी विविध ठिकाणी उठाव व आंदोलने केली. त्यांत कोलाम, गोंड, कोळी, भिल्ल, रामोशी, मुंडा या आदिवासींचा प्रामुख्याने समावेश होता.
४. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावरही आदिवासींचा वनांवरील हक्क मान्य करण्यात आला नाही.
५. म्हणून, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आदिवासींनी चळवळ केली.
आदिवासी चळवळीतील प्रमुख मागण्या:
१. वनांवर व जंगलसंपत्तीवर अधिकार मिळावेत.
२. वनांमध्ये होणारी उत्पादने गोळा करण्याचे अधिकार मिळावेत.
३. वनजमिनींवर अन्य लागवड करण्याचा अधिकार मिळावा.
प्र.2 टीपा लिहा
1) आदिवासी चळवळ उत्तर