History, asked by amarjankar790, 3 months ago

टीपा लिहा : अल्पसंख्याक​

Answers

Answered by asajaysingh12890
3

Answer:

अल्पसंख्याक लोकसमुहाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या न्या.सच्चर समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने दि. २१ फेब्रुवारी २००८ रोजी स्वतंत्र अल्पसंख्याक विकास विभागाची निर्मिती करण्यात आली. अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

निर्मितीची उद्दिष्टे

अल्पसंख्याक लोकसमुहांच्या सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक व सांस्कृतिक अशा सर्वसमावेशक उत्कर्षासाठी तसेच अल्पसंख्याकांच्या हक्काचे संरक्षण करणे.

शासन कार्यनियमावलीनुसार नेमून देण्यात आलेले विषय

अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधानांच्या १५ कलमी कार्यक्रमाचे समन्वयन व आढावा.

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे शासकीय स्तरावरील संनियंत्रण आणि समन्वयन.

महाराष्ट्र राज्य हज समितीचे शासकीय स्तरावरील संनियंत्रण आणि समन्वयन.

राज्यातील अल्पसंख्याकांकडून चालविण्या जाणा-या शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्रे देणे.

वक्फ (वक्‍फ अधिनियमांसह) व त्या अनुषंगीक बाबींची शासकीय स्तरावरील अंमलबजावणी,संनियंत्रण व समन्वयन.

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे शासकीय स्तरावरील संनियंत्रण व समन्वयन

महाराष्ट्र राज्य उर्दु अकादमी यांचे शासकीय स्तरावरील संनियंत्रण व समन्वयन.

न्यायमुर्ती सच्चर समितीच्या स्वीकृत शिफारशीसंबंधातील बाबींची अंमलबजावणी, संनियंत्रण व समन्वयन.

अल्पसंख्याकांसाठी केंद्र पुरस्कृत विविध योजनांचे राज्यस्तरीय समन्वयन.

Similar questions