टीपा लिहा.
(१) छायाचित्रे
Answers
१) छायाचित्रे
उत्तर: छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक् स्वरूपाची साधने आहेत . छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती , घटना त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली . या छायाचित्रांमधून आपणांस व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले , त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते . मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या यांची चित्रे उपलब्ध आहेत ; परंतु सदर चित्रे किती विश्वसनीय आहेत याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात . त्या तुलनेत छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय मानली जातात . व्यक्तींच्या छायाचित्रांवरून ती व्यक्ती कशी दिसत होती , तिचा पेहराव कसा होता याविषयी माहिती मिळते. प्रसंगाच्या छायाचित्रांमधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो तर वास्तू किंवा वस्तूच्या छायाचित्रांमधून त्यांचे स्वरूप लक्षात येते