टीपा लिहा : गिरिजा कीर याच्या बालनाटिकांचे विशेष.
Answers
आज मी गिरिजाकीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोचतोचपणाचा दोष अभावानेही आढळत नाही, हे त्यांचे सर्वां त मोठे यश आहे. त्यांची नाटुकली आपण वाचलीत तर आपल्या असं लक्षात येईल, की चमत्कार, अद्भुतरम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकांच्याच्या विश्वातले. त्यांच्या काही बालनाटि कांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. इटुकली पिटुकली नाटुकली या संचात ‘आमच्या आपल्या गप्पा टप्पा ’, ‘चला खेळू नाटक नाटक’, ‘साळुंकीची कहाणी’, ‘एऽऽ’ गेले गेले’ या बालनाटिका नऊ ते बारा या वयोगटासाठी आहेत. तर ‘नीला राणीचा दरबार’ आणि ‘मी कोण होणार’ या नाटिका बालवर्गासाठी आहेत. मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते, कारण हा प्रांत पूर्ण तया दुर्लक्षित असा आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही बालनाटके साथच देतात.
मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते. नाव आहे, ‘एक अर्ज आहे बाप्पा ’. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशा वेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचार विनिमय करत आहेत. मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो? तर आई, बाबा, शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग त्यांना सहन होत नाही; पण हे सांगणार कुणाला? मग सर्वांना वाटतं, की आपल्या तक्रारीचा पाढाच वाचू अर्जात आणि हा अर्ज चक्क बाप्पा पुढे ठेवूया . देव नक्की प्रसन्न होईल आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्ज लेखन. इथे लेखिकेने काय छान तक्रारी मांडल्यात. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. बरफ का गोला खाण्याची आझादी पाहिजे. भेळ खायला मिळायलाच हवी. मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळीच कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात, त्या प्रसंगात गंमत आली आहे. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभले आहे. छोटे-मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरिजाबाईंच्या नाटकात, प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पात्रांतून जिवंत दृश्य साकार करणे आणि बालप्रेक्षकांची मने जिंकणे ही अवघड बाब आहे; पण बाई ती लीलया पेलतात.
Hope that it will help you