Social Sciences, asked by Studymate1921, 1 year ago

टीपा लिहा: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ

Answers

Answered by shmshkh1190
12

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ हे एक केंद्रीय विद्यापीठ असून याचे मुख्य कार्यालय दिल्ली येथील गढी येथे आहे.  

हे जगातील सर्वात मोठे विद्यापीठ असून येथे जवळजवळ ३३ देशांतील सुमारे ४० लाख विद्यार्थी शिक्षण घेतात.  

या विद्यापीठाची स्थापना भारत सरकारद्वारे १९८५ मध्ये करण्यात आली.  

शिक्षणाद्वारे भारताला बळकट बनवणे हा याचा मुख्य हेतू आहे, येथे शिक्षणाबरोबरच संशोधन आणि प्रशिक्षण दिले जाते.  

हे एक मुक्त विद्यापीठ असून डिस्टंट लर्निंग आणि ऑनलाईन कोर्सेस च्या सुविधा येथे उपलब्ध आहेत.

Similar questions