टिपा लिहा.
(१) केनयातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका.
(२) ‘बिग ५’चे थोडक्यात वर्णन.
Answers
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "बिग ५ च्या सहवासात(स्थूलवाचन)" या पाठातील आहे. या पाठाचे लेखक जयप्रकाश प्रधान आहेत.आफ्रिकेतील 'बिग ५'प्राण्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये लेखकाने या पाठातून व्यक्त केली आहेत
■ टिपा
★(१) केनयातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका- केनयातील अर्थव्यवस्था चार प्रकारच्या उत्पन्नावर अवलंबून असते.१)पर्यटन२) कॉफी३)चहा४) फुले त्यात पर्यटन पहिल्या क्रमांकावर आहे. पर्यटकांनी जंगलात फिरायला जाताना कोणती काळजी घ्यावी याचे नियम करण्यात आलेले आहेत. फिरताना मुख्य रस्ता सोडून आत जाऊ नये.तेथील जनावरांना त्रास देऊ नये. त्यांचा पाठलाग करू नये.नियम तोडणाऱ्यास लगेच दंड केला जातो आणि लगेच जंगलाबाहेर काढण्याचा अधिकार रेंजरला असतो.
★(२) ‘बिग ५’चे थोडक्यात वर्णन- संपूर्ण आफ्रिकेत 'बिग ५'हंस शब्द पूर्वीपासून परीचित
आहे. सिंह, गेंडा, हत्ती, जंगली म्हैस व लेपर्ड हे पाच प्राणी म्हणजेच 'बिग ५' होय.या प्राण्यांची
शिकार करणे अत्यंत कठीण असते म्हणून त्यांना 'बिग ५' म्हटले जाते.
धन्यवाद...