टिपा लिहा नकाराधिकार
Answers
Answered by
13
Answer:
संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद हे संयुक्त राष्ट्रसंघाचे एक मुख्य अंग आहे. सुरक्षा समितीवर जागतिक सुरक्षा व शांतता राखण्याची जबाबदारी आहे.सुरक्षा परिषदेत एकूण पंधरा सभासद राष्ट्रे असतात.अमेरिका,फ्रान्स,इंग्लैंड, रशिया व चिन हि पाच राष्ट्रे सुरक्षा परिषदेची स्थायी सभासद आहेत.दहा अस्थायी सभासद राष्ट्रांची निवड इतर सदस्य राष्ट्रांमधून दोन वर्षासाठी केली जाते.सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सभासदांना नकाराधिकार असतो.स्थायी सभासद राष्ट्रांच्या संमती नाकारण्याच्या अधिकाराला नकाराधिकार म्हणतात.कोणत्याही निर्णयात या पाच राष्ट्रांचा होकार असावा लागतो.यांपैकी एकाही राष्ट्राने संमती न दिल्यास निर्णय फेटाळला जातो.
Similar questions