टीपा लिहा.
(१) रामकृष्ण मिशन
(२) सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीविषयक सुधारणा
Answers
Answer:
1) रामकृष्ण मिशन : एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस बंगालमध्ये स्थापना झालेली आध्यात्मिक क्षेत्रातील एक सेवाभावी संस्था. संस्थापक स्वामी विवेकानंद. मूळ प्रेरणा त्यांचे सद्गुरू ⇨ रामकृष्ण परमहंस यांची. आयुष्याच्या अखेरीस काशीपूरच्या उद्यानगृहात कर्करोगाने आजारी असताना जानेवारी ते ऑगस्ट १८८६ या अवधीत आपल्या आठ-दहा तरुण शिष्यांना व विशेषेकरून विवेकानंदांना म्हणजे त्यावेळच्या नरेंद्राला रामकृष्णांनी जे मार्गदर्शन वेळोवेळच्या संवादांतून केले, त्यामध्ये रामकृष्ण मिशनच्या स्थापनेचे बीज आहे. नरेंद्राला समाधीचा पहिला अनुभव आला तेव्हाच रामकृष्ण त्याला म्हणाले, ‘तुला या जगात जगन्मातेचे काही कार्य करायचे आहे, ते पुरे होईतो तुला या आनंदात बुडून राहता येणार नाही’. त्यानंतर आपल्या अंतरंगशिष्यांपैकी नरेंद्र, राखाल आदी अकरा जणांना रामकृष्णांनी भगवी वस्त्रे व रुद्राक्षाच्या माळा दिल्या, छोटासा विधी करून संन्यास दिला आणि एके दिवशी भिक्षा मागून आणण्यास सांगितले. रामकृष्णांनी दिलेला हा संन्यास म्हणजे रामकृष्ण मिशनचा मूळ प्रारंभ होय, अशी त्यांच्या शिष्यांची धारणा आहे. अगदी अखेरीस निरवानिरव करावी त्याप्रमाणे रामकृष्णांनी नरेंद्रास म्हटले, ‘माझ्या मागे या सर्व मुलांची नीट काळजी घे, यांतील कुणी घरी परत जाणार नाही व संसाराच्या पाशात अडकणार नाही ते पहा.’ आपली पत्नी सारदादेवी यांना रामकृष्ण म्हणाले, ‘तुम्हालाही काही कार्य करावे लागेल.’ सारदामातेचे वात्सल्यपूर्ण मार्गदर्शन पुढे १९२० पर्यंत या अंतरंगशिष्यांना मिळत राहिले.