टिपा लिहा १ संत एकनाथ
Answers
Answered by
1
Answer:
- ज्ञानदेवांनी स्थापलेल्या वारकरी संप्रदायामधील संत एकनाथ हे एक संत होते.
- संत एकनाथांचा जन्म संत भानुदासांच्या कुळामध्ये देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबात 1533 साली पैठण येथे झाला
- त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी तर वडिलांचे सूर्यनारायण होते.
- एकनाथांच्या पत्नीचे नाव गिरिजाबाई होते.
- एकनाथांना गोदा व गंगा नावाच्या दोन मुली आणि हरिपंडित नावाचा एक मुलगा होता.
Explanation:
- जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरू होत. एकनाथांनी वयाच्या बाराव्या वर्षी देवगिरी येथील जनार्दनस्वामींचे शिष्यत्व स्वीकारले.
- संत एकनाथांनी आळंदीस जाऊन ज्ञानेश्वरांच्या समाधीचे जीर्णोद्धार केले. ज्ञानदेवांनी सुरू केलेले भागवत संप्रदायाचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात पुढे चालू केले.
- एकनाथांनी महाराष्ट्रात वासुदेव संस्थान नावाची चळवळ सुरू केली.
- त्या काळात समाजातील स्त्रियांवर होत असलेले अन्याय, अत्याचार या विषयी ‘रोडगा’ या भारुडातून त्यांनी स्त्रियांच्या मनाची स्थिती व्यक्त केली आहे.
- एकनाथ हे महाराष्ट्रातील अस्पृश्यतेच्या सुरुवातीच्या सुधारकांपैकी एक होते, ते मध्ययुगाच्या उत्तरार्धात कार्यरत होते
Similar questions